setting for congress candidates in Cuncolim
setting for congress candidates in Cuncolim 
गोवा

कुंकळ्ळीत काँग्रेस उमेदवारीसाठी ‘फिल्डींग

गोमंतक वृत्तसंस्था

कुंकळ्ळी:  कुंकळ्ळी मतदारसंघ हा कॉग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात बहुतांश निवडणुकीत काँग्रेसनेच बाजी मानली आहे. अपवाद होता तो जनता पक्षाचे फेरदिन रिबेलो उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त न्यायाधीश रिबेलो यांनी काँग्रेसला दिलेल्या दणक्याचा. युगोडेपाचे आरेसियो डिसोझा यांनी शाताराम नाईक यांचा पराभव केला होता व भाजपचे राजन नाईक यांनी काँग्रेसचे भलाढ्य उमेदवार व माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांना दणका देऊन इतिहास घडविला होता. विद्यमान आमदार क्लाफास डायस हे निवडून आले होते. काँग्रेसच्या उमेदवारीवर मात्र काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपवासी झाले. 

सध्या काँग्रेसमध्ये एक वैक्यूम निर्माण झालेला असून हा वैकुम भरण्यासाठी काँग्रेस योग्य चेहऱ्याच्या शोधात आहे. पक्षालाही योग्य चेहऱ्याची गरज आहे, तर इच्छुक उमेदवारांनाही पक्षाची गरज आहे. सध्या काँग्रेस उमेदवारीवर डोळा ठेऊन असल्यापैकी सगळ्यात वर नाव आहे ते माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांचे सुपुत्र युरी आलेमाव यांचे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ज्योकीम आलेमाव यांनी पक्षाचा त्याग करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. आलेमाव यांनी काँग्रेसशी गद्दारी करून नंतर आपले सुपुत्र युरी आलेमाव यांना गोवा फॉरवर्डचे उमेदवार म्हणून पुढे केले होते. क्लाफास डायस भाजपात गेल्यामुळे आता ज्योकीम व युरी यांना काँग्रेसचे वेध लागले आहेत. ज्योकीम आलेमाव यांचे खदे समर्थक आसिस नोरोन्हा यांची काँग्रेस गट अध्यक्षपदी निवड करून आलेमाव यांनी युरी व स्वतःसाठी काँग्रेस प्रवेशाची वाट मोकळी करून घेतली आहे. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्याकडे आलेमाव यांचे नाते घट्ट बनलेले असून आपले परममित्र म्हणणारऱ्या विजय सरदेसाईंच्या हातात नारळ देऊन ज्योकीम व युरी हाताचा झेंडा हातात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आठ नोव्हेंबरला ज्योकीम आलेमाव यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या मुहूर्तावर ज्योकीम व युरी आपल्या समर्थकांसह काँग्रेसवासी होणार असे संकेत मिळत आहेत. ज्योकीम आलेमाव व युरी यांनी कुंकळ्ळी मतदारसंघात गोवा फॉरवर्डची संपर्क कार्यालये उघडली होती. या कार्यालयावर लावलेले गोवा फॉरवर्डचे फलक उतरविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हल्लीच एका कार्यक्रमात बोलताना गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही अशी गर्जना केली होती. गिरीश चोडणकर हे ज्योकीम यांना कसे पक्षात घेणार असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

ज्योकीम आलेमाव बाहेरील असल्यामुळे मतदारांनी त्यांना दोनदा पराभूत केले होते. युरी यांना पक्षात घेऊन कुंकळ्ळी मतदारसघाची उमेदवारी देण्यास काँग्रेस पक्षातच विरोध होत आहे. काही निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते युरी आलेमाव यांना उमेदवारी देण्याच्या विरोधात आहेत. काही स्थानिक नेत्यांनी सेवा निवृत्त आयएएस अधिकारी व आपच्या प्रमुखपद सोडलेले एल्विस गोम्स यांना काँग्रेस पक्षात ओढण्याच्या प्रयत्नात आहेत. यासंदर्भात काहीजण गोम्स यांच्या संपर्कात असले तरी गोम्स यांच्या होकारावर सर्व निर्भर आहे. एक मात्र खरे गोम्स काँग्रेस पक्षात आल्यास तो काँग्रेसला बोनस ठरू शकतो.
गोवा पोलिसात सध्या पोलिस अधीक्षक असलेले व तियात्र कलाकार सेमी तावारीस यांचेही नाव काँग्रेस उमेदवार म्हणून घेतले जात आहे. तावारीस पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी निवडणूक लढण्याचे गांभीर्याने घेतले नसल्याचे कळते. 
काँग्रेस युरी यांना हात देणार, एल्विस गोम्स यांना जवळ करणार की सेमी यांच्या पैज लावणार हे अजून कळण्यास बराच वेळ असून युरी व ज्योकीम आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेतल्यास मात्र काँग्रेसला कार्यकर्त्यांचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता आहे.

कुंकळ्ळी मतदारसंघात संतोष फळदेसाई, प्रशांत नाईक हेही निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असून त्यांनी या दृष्टीने कामास सुरवात केली आहे. कुंकळ्ळीतून भाजप उमेदवारीवर उपनगराध्यक्ष विदेश देसाई डोळा ठेऊन आहेत. कुंकळ्ळीच्या मतदारांच्या मनात काय आहे हे तूर्त सांगणे कठीण असले तरी इच्छुकांनी मात्र ‘फिल्डींग’ लावण्यास सुरवात केली आहे हे मात्र खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT