CM Sawant talking with Mine Workers at Bicholim (Goa Mine Issues) Dainik Gomantak
गोवा

प्रसंगी ‘जेलभरो’ आंदोलन करणार

‘सेझा’ कामगारांचा आक्रमक पवित्रा; कपात नोटिशीमुळे खळबळ

दैनिक गोमन्तक

डिचोली : खाणी कधी एकदा सुरू होतात आणि हातांना कधी काम मिळते, याची डोळ्यांत तेल घालून वाट पाहणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या हालचाली सेझा गोवा (वेदांता) कंपनीने सुरू केल्या आहेत. तशी नोटीसही कंपनीने बुधवारी जारी केली आहे.

येत्या ऑक्टोबरपासून कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे आधीच अस्वस्थ बनलेल्या डिचोलीतील या कामगारांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. कामगारांना घरी बसवून खाणी सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यात येईल, प्रसंगी ‘जेलभरो’ आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, दीपक पोपकर, राजेश गावकर, महेश होबळे, अनिल सालेलकर, संजय मांद्रेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

‘सेझा गोवा’ कंपनीने कामगारांना बजावलेल्‍या नोटिशीप्रकरणी गुरुवार दि. 7 जुलै रोजी सकाळी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर कामगारांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनीही या कामगारांना वेळ दिली आहे, अशी माहिती किशोर लोकरे यांनी दिली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, याकडे कामगारांसह कंपनी व्‍यवस्‍थापनाचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT