Service road work started at Agonda-Palolem Beach Dainik Gomantak
गोवा

अखेर आगोंदा-पाळोळे बीच येथील सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात

आगोंदा-पाळोळे जंक्शन ते पाळोळे बीच पॉइंटपर्यंत सर्व्हिस रोडचे नूतनीकरण गुरुवारी सुरू झाले.

दैनिक गोमन्तक

पाळोळे बीच येथील सर्व्हिस रोडचे काम रखडले होते. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना प्रवासासाठी त्रास होत होता. अखेर आगोंदा-पाळोळे जंक्शन ते पाळोळे बीच पॉइंटपर्यंत सर्व्हिस रोडचे नूतनीकरण गुरुवारी सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) सहाय्यक अभियंता स्वप्नील देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ते काम या आठवड्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Service road work started at Agonda-Palolem Beach)

ते म्हणाले की, 82.2 लाख रुपये खर्चाच्या या कामामध्ये खड्डे दुरुस्त करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा दुरुस्त करणे आणि 30 मिमी हॉट-मिक्स यांचा समावेश असेल.

काणकोण म्युनिसिपल कौन्सिल (सीएमसी) चे अध्यक्ष, मारियो सायमन रेबेलो म्हणाले की, हा रस्ता ठीक नसल्यामुळे त्याचा पाळोळेमधील पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. कारण रस्त्याची अवस्था पाहून अनेक पर्यटक मागे वळून जात असत. आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच पर्यटक इतर किनारे पसंत करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Street Dog: भटक्या कुत्र्यांना अन्न वाढणाऱ्या महिलेला दम, उपद्रव वाढल्याने नागरिक संतप्त

Goa Politics: खरी कुजबुज; युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

Goa Assembly Live: प्लास्टिकला रोखण्यासाठी 'डीआरएस' हवी!

Saligao Accident: साळगाव येथे दुचाकींचा भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू; तर दोघांची प्रकृती गंभीर

ग्रामपंचायतीने दाखविला विधानसभा प्रश्‍नाला ठेंगा, माहिती नंतर सादर करतो म्हणण्याची मंत्र्यांवर वेळ; 'त्या' सरपंचावर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT