Vasco | शुक्रवारी मुरगाव नगरपरिषदेच्या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. ज्यामध्ये प्रामुख्याने रेंट-अ-बाईक चालकांनी पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे, खारीवाडा आणि बायणा भागातील किनारपट्टीवरील मच्छिमारांची घरे नियमित करणे आणि दोन बाल उद्यानांचे सुशोभीकरण या समस्यांवर समावेश होता.
खारीवाडा, बायणा आदी भागातील मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची घरे लवकरात लवकर नियमित करण्यात यावीत यावर नगरसेवकांचे एकमत होते. (Houses of Vasco fishermen should be regularised Councillor Mathias Monteiro said)
काऊन्सिलर मॅथियास मॉन्टेरो यांनी राज्य सरकारने मच्छिमारांसह किनारपट्टीवरील समुदायांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती केली. ते म्हणाले की, बायणा आणि खारीवाडा येथे समुद्रकिनाऱ्यावर अनेक पिढ्यांपासून अनेक मच्छिमार राहत आहेत आणि त्यांची घरे 1991 पूर्वी अस्तित्वात होती. सीआरझेड 1991 च्या अधिसूचनेनुसार, ही घरे सरकारने आता नियमित केली पाहिजेत.
मुरगाव महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश पार्किंगच्या जागेवर भाडेतत्त्वावर दुचाकी चालकांनी केलेल्या बेकायदेशीर कब्जांबाबतही चर्चा या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि नगरसेवकांनी यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.