Panjim fire today Dainik Gomantak
गोवा

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Kala Academy Goa Fire: सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असून, परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Akshata Chhatre

Serendipity Festival Fire: गोव्यातील हडफडे येथील नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची घटना ताजी असतानाच, राजधानी पणजी येथे कला अकादमीजवळ आयोजित करण्यात येत असलेल्या 'सेरेंडिपीटी' महोत्सवाच्या ठिकाणीही आज सोमवार (दि.८) रोजी संध्याकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या घटनेत मोठा अनर्थ टळला असून, परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

वेल्डिंगमुळे भडकला भडका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणजी येथील कला अकादमीजवळ 'सेरेंडिपीटी' महोत्सवासाठी सेट तयार करण्याचे काम सुरू होते. याच ठिकाणी प्लायवूड (Plywood) आणि स्पंजसारख्या (Sponge) ज्वलनशील वस्तूंना आग लागली.

आगीच्या कारणाबद्दल प्राथमिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, येथे उंचीवर वेल्डिंगचे काम सुरू होते आणि त्यातून उडालेल्या एका ठिणगीमुळे ही आग लागण्याची शक्यता आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

या घटनेत सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कला अकादमीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात त्वरित यश मिळवले. त्यांच्या सतर्कतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि कोणतीही मोठी हानी झाली नाही.

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, हे महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षी देखील आयनॉक्स पणजी येथे सेटचे काम सुरु असताना आग लागली होती. यापूर्वी हडफडे येथील नाईट क्लबमध्ये आग लागून २५ निष्पाप लोकांचा जीव गेला होता.

सुरक्षा नियमांचे पालन पोलिसांचे आदेश

पोलिसांनी कला अकादमी, पणजी येथे सुरू असलेल्या 'सेरेंडिपीटी' महोत्सवाच्या तयारीमध्ये आवश्यक सुरक्षा नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT