Goa TMC  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा तृणमूलवर माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप

काँग्रेस,फाॅरवर्डची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल आणि आयपॅक मतदारांची माहिती गोळा करून एक मोठा कट रचत असल्याचा आरोप करत, त्यांच्याकडे असलेला डेटा निवडणूक आयोगाने जप्त करावा, अशी मागणी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने संयुक्तपणे केली.

यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी शनिवारी संयुक्तपणे पणजीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. (Sensational allegations of misuse of information against Goa TMC)

कवठणकर म्हणाले की, टीएमसी आणि आयपॅक काही योजना सुरू करून मतदारांचा डेटा गोळा करत आहेत. ते लोकांंची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत. त्यासाठी त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

गोव्याची प्रयोगशाळा करू देणार नाही

टीएमसी गोव्याला TMC Goa प्रयोगशाळा म्हणून वापरत आहे आणि भाजपला Goa BJP सत्तेत येण्यासाठी मदत करत आहे. टीएमसी एकही जागा जिंकणार नाही, ते मतांचे विभाजन करण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी येथे आहेत,असे दुर्गादास कामत म्हणाले. याबाबत निवडणूक आयोगाकडे Election Commission तक्रार केल्याचे सांगून आम्ही टीएमसी आणि आयपॅकला गोव्यातील मतदारांचा डेटा विकू देणार नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT