Amit Shah Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठ नेत्यांना गोव्याच्या राजकीय परिस्थितीची चिंता, अमित शहांनी दौरा वाढवला

2017 प्रमाणेच 13 जागांवर अडकली जाऊ शकते भाजपची दौड

दैनिक गोमन्तक

पणजी : केवळ एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गोव्यातील आपले वास्तव्य वाढवावे लागले. गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल केंद्रीय नेत्यांची चिंता वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे (BJP) केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आणखी एक दौरा करावा लागत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) बुधवारी एका दिवसाच्या गोवा (goa) दौऱ्यावर आले होते. त्यांनी गोव्यात साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रचारसभेत भाषण केले. त्यांनी घराघरात भेट देऊन प्रचारही केला.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हेसुद्धा एका दिवसाच्या दौऱ्यावर गोव्यात आले होते. त्यांनी फोंडा व प्रियोळ मतदारसंघातील प्रचारसभेत भाषण केले.

अमित शहा बुधवारीच आपला दौरा आटोपून दिल्लीकडे प्रयाण करणार होते. परंतु बुधवारी रात्री त्यांनी राज्यातच मुक्काम करून गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ते दिल्लीकडे रवाना झाले.

बुधवारी रात्रीचा आपला मुक्काम वाढवून त्यांनी भाजपच्या वॉररूममध्ये परिस्थितीचा आढावा घेतला. गोव्यात प्रस्थापित विरोधी लाट असल्याचा अंदाज राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या बाजूला काही विश्वासार्ह सर्वेक्षण कंपन्यांनी केलेल्या पाहणीत कॉंग्रेस (Congress) पक्ष सत्तेवर येऊ शकत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, भाजपाची दौड 2017 प्रमाणेच 13 जागांवर अडकली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस-गोवा फॉरवर्डचा रथ सत्तेच्या निकट जाऊ शकतो.

कॉंग्रेस पक्ष सत्तेवर येऊ शकणार असल्याचा सर्वेक्षण कंपन्यांचा अंदाज

2017 प्रमाणेच 13 जागांवर अडकली जाऊ शकते भाजपची दौड

प्रस्थापित विरोधी लाट असल्याचा अंदाज राजकीय धुरीणांचा अंदाज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT