Selaulim Dam Water Level Decrease Dainik Gomantak
गोवा

Selaulim Water Level: यंदा 23 वर्षातील सर्वाधिक पाऊस; मात्र साळावलीतील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमीच...

यंदा अनियमित पावसामुळे राज्यातील पाण्याचा साठा कमी झाला आहे.

Kavya Powar

Selaulim Dam Water Level Decrease: यंदा अनियमित पावसामुळे राज्यातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. सांगे तालुक्यातील साळावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी 23 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठ्याची पातळी कमी आहे.

सोमवारी धरणातील पातळी 41.35 मीटर होती. गेल्या वर्षी याच तारखेला, कमी पाऊस असूनही पातळी 41.82 मीटर होती.

धरणाची देखरेख करणारे जलसंपदा विभागाचे (WRD) कार्यकारी अभियंता जेसन मिनेझिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी साळावलीत विक्रमी पाऊस पडला असला तरी, केवळ काही भागांनाच सततच्या पावसाचा फायदा झाला आहे.

रविवार ते सोमवार सकाळ दरम्यान एकूण 9.8 मिमी पावसासह, पर्जन्यमापक केंद्राने सोमवारपर्यंत एकूण 3,465.4 मिमी पावसाची नोंद केली. गेल्या वर्षी हा आकडा 11 सप्टेंबरपर्यंत 3,167.2 मिमी इतका होता. साळावली धरणात सध्या 237.68 दशलक्ष घनमीटर (MCM) पाणीसाठा आहे.

धरणाची पूर्ण जलाशय पातळी (FRL) 41.15m आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) दररोज सुमारे 160 दशलक्ष लिटर (MLD) पाण्यावर प्रक्रिया करते. या धरणातील पाणी सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव आणि फोंडा तालुक्यातील बोरी गावाच्या काही भागांना पुरवले जाते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठ्याची पातळी कमी असल्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT