Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News : मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंचपदी सीमा आरोंदेकर

Mayem News : अंतर्गत करारानुसार विद्यानंद कारबोटकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर मये-वायंगिणी पंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News :

डिचोली, तालुक्यातील मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे सीमा आरोंदेकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्त सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत आरोंदेकर यांची बिनविरोध निवड झाली. गत पंचायत मंडळाच्या कार्यकाळात सीमा आरोंदेकर यांनी सरपंचपद भूषविले होते.

अंतर्गत करारानुसार विद्यानंद कारबोटकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर मये-वायंगिणी पंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. नवीन सरपंच निवडण्यासाठी शनिवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस मावळते सरपंच विद्यानंद कारबोटकर उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्यासह दिलीप शेट, वासुदेव गावकर, कृष्णा चोडणकर,

विशांत पेडणेकर, कनिवी कवठणकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर आणि विनिता पोळे हे पंचसदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी सीमा आरोंदेकर यांनी सादर केलेला एकमेव अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरुन त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पंचायत सचिव महादेव नाईक यांनी सहकार्य केले. आमदार प्रेमेंद्र शेट तसेच सर्व पंचसदस्यांच्या सहकार्याने पंचायतीचा विकास पुढे नेण्यासाठी मी कार्यरत राहणार, असे नवनिर्वाचित सरपंच आरोंदेकर यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT