See the live location of the storm on your mobile 
गोवा

CYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर

दैनिक गोमंतक

अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे "तीव्र चक्रीवादळ वादळ" येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मेटरॉलिजिकल लॉजीकल विभागाने  (India Meteorological Department) काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यानुसार 'तौकते' नामक वादळ आता पुढच्या 24 तासांत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. किनारी भागांमध्ये या वादळाचे परिणाम दिसायला  सुरुवात  अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्याची माहिती मिळते आहे. (See the live location of the CYCLONE TAUKTAE on your mobile)

तौकते या वादळाचा केरळ, लक्षद्वीप या राज्यांना फटका बसण्याची शक्यता असून गोवा, कोकण तसेच मुंबईच्या किनारी  भागांवर देखील काही स्वरूपात परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. याकाळात जोरदार वारा आणि पाऊस होणार असल्याची  हवामान  आहे. मात्र तरीदेखील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता तुम्ही या वादळाचे लाईव्ह लोकेशन तुमच्या फोनद्वारे सुद्धा पाहू शकता. खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये पाहू शकता. 

mausam.imd.gov.in
तौकते चक्रीवादळाची सद्यस्थिती माहित करून घेण्यासाठी, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात विश्वासार्ह संकेतस्थळांपैकी mausam.imd.gov.in ही एक वेबसाइट आहे. ही वेबसाइट भूविज्ञान मंत्रालयाने(पृथ्वी विज्ञान मंत्रालय) विकसित केली आहे. या माध्यमातून आपण तौकतेसह वेगवेगळ्या वादळांचे लाईव्ह लोकेशन पाहू शकता. सध्याच्या तौकते वादळाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी गूगल सर्चवर mausam.imd.gov.in टाइप करा आणि खालील वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वादळाचे लाईव्ह लोकेशन दिसेल. 

www.cyclocane.com ही सुद्धा एक विश्वासार्ह वेबसाइट आहे ज्यामाध्यमातून चक्रीवादळांचा रीअलटाइम ट्रॅक करू शकतो. www.cyclocane.com वेबसाइटवर जा आणि अधिक तपशील मिळवण्यासाठी साइटवर उपलब्ध तौकते वडाळ्याच्या लिंक वर क्लिक करा.

www.hurricanezone.net
चक्रीवादळाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी आपण या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.  या वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावरच तुम्हाला वादळाबद्दलची माहिती मिळेल. तसेच वादळाचे लाईव्ह लोकेशन सुद्धा पाहता येईल. तसेच अधिक माहितीसाठी आपण वेबसाइटवर दिलेल्या चक्रीवादळावरील चिन्हावर क्लिक करू शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, चक्रीवादळ आणि चक्रीवादळ बुलेटिन आणि जागतिक स्तरावर उपग्रह आणि रडार प्रतिमा आपण पाहू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: आरोग्याशी खेळ! इडली-सांबार, डोसा आणि मेदूवड्यासाठी दूषित पाण्याचा वापर; कळंगुटमध्ये 13 विक्रेत्यांवर 'एफडीए'ची कारवाई

Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

Saudi Arabia Airstrikes Yemen: येमेनमध्ये सौदी अरेबियाचा भीषण हवाई हल्ला! महिला- लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली VIDEO

खरी कुजबुज; काँग्रेसचा 'हात' कोणाबरोबर?

Job Scam: शिक्षिका होण्याचे स्वप्न दाखवून 12 लाख उकळले! सरकारी नोकरीच्या नावाखाली गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT