Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : बैठ्या जीवनशैलीमुळे युवकांत वाढते असंसर्गजन्य रोग : संजित रॉड्रिग्स

Panaji News : ‘एफडीए’तर्फे मडगावात ‘इट राइट’ मेळ्याचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सध्याच्या काळात बैठ्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजार आपल्या तरुण पिढीला झपाट्याने जडत आहेत. आपण जे अन्न घेतो, त्याचा थेट संबंध आरोग्याशी असतो.

त्यामुळे खाण्यापिण्याबाबत जनजागृतीची गरज आहे,असे प्रतिपादन नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार सचिव संजित रॉड्रिग्स यांनी केले.

योग्य खाणे आणि निरोगी राहणे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, ‘एफडीए’ने ‘निरोगी भविष्यासाठी आज योग्य आहार घ्या’ या संकल्पनेवर रवींद्र भवन, मडगाव येथे ‘इट राइट मेळा’ या आरोग्यदायी खाद्य महोत्सवाची तिसरी आवृत्ती आयोजित केली होती.  उद्‍घाटनप्रसंगी रॉड्रिग्स बोलत होते.

यावेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू आणि मडगाव पालिका मुख्याधिकारी गौरेश शंखवाळकर,एफडीए संचालक ज्योती सरदेसाई आदी उपस्थित होते. आरोग्याबाबत प्रत्येकाने जागृत राहून त्यादृष्टीने अन्न घ्यावे,असेही रॉड्रिग्स म्हणाले.

‘इट राइट इंडिया’ हा एफएसएसएएल चा उपक्रम आहे. जो एफडीएमार्फत राज्यात राबवला जातो. या कार्यक्रमात वीसहून अधिक स्टॉल्सवर आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे प्रदर्शन मांडले होते. ताज एक्सोटिका, बाणावली यांच्या आरोग्यदायी पाककृतींचे प्रात्यक्षिक इथे होते. माध्यान्ह भोजन पुरवठादारांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आचारींसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात आली.

फूड बिजनेस आॅपरेटर्सचा सत्कार

या कार्यक्रमात स्वच्छता मानांकन प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या फूड बिझनेस ऑपरेटर्सचा सत्कार करण्यात आला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला इट राइट कॅम्पस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

गोव्यातील कलाकार आणि प्रख्यात लाइव्ह बँड यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: '..हा अपघात नाही घातपात'! बार्रेटो मृत्‍यूप्रकरणी आईकडून शंका; न्यायासाठी राष्‍ट्रपती, पंतप्रधानांकडे साकडे

Goa Politics: खरी कुजबुज; डॉ. रमेश तवडकरांची घुसमट

Kalsa Banduri Project: 'कळसा–भांडुराची हवाई पाहणी व्‍हावी, पोलिस संरक्षण मिळावे'; म्‍हादई बचाव समितीची CM सावंतांकडे मागणी

Anganwadi: खुशखबर! अंगणवाडी सेविकांना 2 हजार, मदतनिसांना मिळणार 1 हजार वाढ

Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT