Flight Canva
गोवा

Bomb Threat on Goa: गोवा-अहमदाबाद विमानात बॉम्ब ठेवल्‍याची धमकी! ‘दाबोळी’, ‘मोपा’वर कडक सुरक्षा; एकाच दिवशी 85 विमानांसाठी ट्विट

Dabolim and Mopa Airport: गोव्यातून अहमदाबाद येथे आज दुपारी गेलेल्या विमानात बॉम्ब ठेवण्‍यात आल्‍याची धमकी देण्‍यात आल्‍यानंतर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर या विमानाची आणि प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Airports on High Alert Following Bomb Threat on Flight

पणजी: गोव्यातून अहमदाबाद येथे आज दुपारी गेलेल्या विमानात बॉम्ब ठेवण्‍यात आल्‍याची धमकी देण्‍यात आल्‍यानंतर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर या विमानाची आणि प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली.

या प्रकारामुळे दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही विमानतळांवर बॉम्ब पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच धमक्‍यांबाबत चौकशी केली जात आहे.

देशात एकाच दिवशी ८५ विमानांसाठी ट्विट

राष्ट्रीय पातळीवरही अनेक विमानांना बॉम्बने उडवून देण्‍याची धमकी मिळाली आहे. आज दिवसभरात ८५ मार्गांवरील विमाने बॉम्‍बने उडून देण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याचे वृत्त विविध वृत्तवाहिन्‍यांनी दिले आहे. तर, गेल्‍या अकरा दिवसांत अडीचशे मार्गांवरील विमानांना अशी धमकी मिळाली आहे.

विमान कंपन्‍यांना नाहक भुर्दंड

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सदर विमान नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरविण्यात येते. यामुळे केवळ इंधनाचा वापरच जास्त होत नाही तर विमानाची पुनर्तपासणी, प्रवाशांना हॉटेलमध्ये बसवण्याची आणि त्यांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेण्याची व्यवस्थाही करावी लागते. त्‍यामुळे एका विमानातील प्रवाशांवर सुमारे ३ कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT