Mapusa Car Accident Dainik Gomantak
गोवा

Mapusa Car Accident: भरधाव कारने दिली धडक, गिरी म्हापसा येथे 53 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

अपघातात या इसमाचा पाय मोडला, उपचारासाठी त्यांना म्हापसा येथे रूग्णालयात घेऊन जात असताना, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

भरधाव कारने दिलेल्या धडकेत 53 वर्षीय सुरक्षा रक्षाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.12) रात्री 8.45 वाजता ही घटना घडली. अपघातात या इसमाचा पाय मोडला, उपचारासाठी त्यांना म्हापसा येथे रूग्णालयात घेऊन जात असताना, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अनिल कांता सिंग (वय 53) असे या अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. अनिल हे अँथनीवाडा- गिरी येथील रहिवासी आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी कारचालक संशयित रमेश बरड (वय 35, रा. आगशी) याला अटक केली आहे.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सिंग बसमधून उतरल्यानंतर गिरी महामार्गावरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी वेगाने येणाऱ्या एका कारने (जीए 07 एन 5138) त्यांना जोराची धडक दिली. यात अनिल यांचा पाय मोडला. तसेच, पोटाला देखील जखम झाली.

जखमी अनिल यांना रूग्णवाहिकेतून म्हापसा येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT