Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर उसगाव येथील कत्तलखाना परिसरात 4 दिवस जमावबंदी

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda News: मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण 29 जून रोजी साजरा होत आहे. त्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता फोंड्यातील उसगाव येथील कत्तलखाना परिसरात चार दिवसांसाठी जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे.

दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

त्यानुसार या काळात 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंधने असतील. या कत्तलखान्याच्या कंपाऊंडपासून एक किलोमीटर परिघात हा आदेश लागू असणार आहे. 28 जूनच्या मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होणार आहे. तो 2 जुलैपर्यंत लागू असेल.

जर कुणी या आदेशाचा भंग केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

गेल्या काही काळामध्ये या कत्तलखान्याजवळ जमून काही लोकांनी कत्तलीला विरोध केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातून सणउत्सव काळात सामाजिक शांततेला बाधा पोहचू नये, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT