Tika utsav 2.jpg 
गोवा

Tika Utsav: गोव्यात 26 मे पासुन टीकोत्सवाच्या दूसऱ्या टप्प्याला सुरूवात...

दैनिक गोमंतक

पणजी: गोवा सरकार कोविड -19 विरूद्ध लसी (Vaccination) देण्यासाठी 26 मेपासून राज्यातील सर्व पंचायत आणि नगरपालिकांमध्ये 'टीका उत्सव' (Tika Utsav) सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सांगितले. यापूर्वी टीका उत्सव ज्या ठिकाणी घेण्यात आला होता तेथे लसीकरण केंद्र असतील. टीका उत्सवाअंतर्गत लसीचा फक्त पहिला डोस दिला जाईल. दुसऱ्या डोस त्यांना आपापल्या आरोग्य केंद्रांकडून मिळेल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. (The second phase of Tika utsava starts from May 26 in Goa )

राज्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना शंभर टक्के लसीकरण व्हावे, यासाठी गोवा सरकारने अनेक प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न अद्याप साध्य झालेले नव्हते. आतापर्यंत 45 वर्षांवरील फक्त 60 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित 40 टक्के लोकांना लसीकरण करून शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी 26 मे ते 7  जून या काळात राज्यभर पुन्हा एकदा ‘टीका उत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुर्वीच दिली होती.

कालच राज्यातील कोरोना परीस्थीती बहद राज्यात सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण देण्यासाठीची सध्याची स्थिती काय आहे. लसीकरणाचे डोस मिळवण्यासाठी सरकार (Government) पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे, की खासगीरीत्या लस (Private Vaccination Center)  घेण्याची योजना आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा ‘डीसीजीआय’ची (DCGI) मान्यता नसलेल्या आयव्हरमेक्टिन (Ivermectin) गोळ्यांचे लोकांना केले जाणारे वितरण व इस्पितळातील आग प्रतिबंधक यंत्रणेच्या उपलब्धतेबाबतची माहिती येत्या गुरुवारपर्यंत (27मे) प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे (High Court) न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते व न्यायमूर्ती महेश सोनक यांनी आज सरकारला देत ही सुनावणी आता येत्या 28 मे रोजी ठेवली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT