Goa Police Dainik Gomantak
गोवा

दुसरा विवाह, युवती आणि तिच्या आईची आर्थिक फसवणूक; विभागीय चौकशीत आगशीचे PSI पिंगे दोषी

कामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

विवाहित असूनही दुसरा विवाह करून युवतीची फसवणूक केली तसेच, युवती आणि तिच्या आईचे ATM कार्ड विविध ठिकाणी वापरून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विभागीय चौकशीत सध्या आगशी येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे उर्फ रूशल दोषी आढळले आहेत.

फसवणूक, कामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांच्या विभागीय चौकशीत पिंगे दोषी आढळले आहेत. वास्को येथील मुलीने PSI पिंगे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पिंगे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली.

चौकशीत 245 पानी कागदपत्रे, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप यांचा समावेश आहे. चौकशीत पिंगे यांनी युवती आणि तिच्या आईचे ATM कार्ड वारंवार स्वाईप केले तसेच, इतर ठिकाणी देखील त्याचा वापर केला. असे चौकशी अहवालात म्हटले आहे.

पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे विवाहित असून देखील युवतीशी देवळात दुसरा विवाह केला. तसेच, पीडित युवती आणि त्याच्या आईचे ATM कार्ड वारंवार स्वाईप करून आर्थिक फसवणूक केली. असा आरोप त्यांच्यावर आहे.

पिंगे 2020 साली पणजीतील पोलीस नियंत्रण कक्षात होते. तेव्हापासूनच पिंगे तरूणीच्या संपर्कात होते. त्याचेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. 2021 मध्ये पिंगेने तरूणीशी लग्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT