Zuari Bridge Dainik Gomatak
गोवा

Zuari Bridge: नवीन झुआरी ब्रिजची दुसरी लेन नोव्हेंबरपर्यंत खुली

अतुल जोशी : जुलैमध्ये खराब हवामानामुळे रखडले होते काम

दैनिक गोमन्तक

Zuari Bridge:

बहुप्रतिक्षित नवीन झुआरी केबल स्टेड पुलाची दुसरी लेन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल. जुलैमध्ये गोव्यातील खराब हवामानामुळे पुलाचे काम काही काळ थांबले होते, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनचे स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी दिली.

गोमंतक’ने दिलीप बिल्डकॉनचे स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि नवीन झुआरी केबल स्टेड ब्रिजच्या दुसऱ्या लेनच्या प्रगतीची माहिती घेतली असता, जोशी यांनी सांगितले की, दुसऱ्या लेनचे थोडेच काम शिल्लक आहे. या पुलाच्या चार सेगमेंट लिफ्टिंगचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. दुसऱ्या लेन केबल स्टेड ब्रिजचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल आणि ही बाजू प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

पावसामुळे कामास उशीर

जोशी यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे क्रेन व इतर अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठे काम करणे कठीण झाले होते. पावसात समुद्र खवळलेला असल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला. दुसऱ्या लेनचे जवळपास ९७ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Street Dog: भटक्या कुत्र्यांना अन्न वाढणाऱ्या महिलेला दम, उपद्रव वाढल्याने नागरिक संतप्त

Goa Politics: खरी कुजबुज; युरींना मिळणार मर्जीतले पोलिस

Goa Assembly Live: प्लास्टिकला रोखण्यासाठी 'डीआरएस' हवी!

Saligao Accident: साळगाव येथे दुचाकींचा भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू; तर दोघांची प्रकृती गंभीर

ग्रामपंचायतीने दाखविला विधानसभा प्रश्‍नाला ठेंगा, माहिती नंतर सादर करतो म्हणण्याची मंत्र्यांवर वेळ; 'त्या' सरपंचावर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT