Court Dainik Gomantak
गोवा

Goa : गोव्यातील ‘त्या’ कुटुंबाला मिळणार 3 कोटींची भरपाई

कर्नाटकात खलाशाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लवादाचा आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa : घरातील कर्ती व्यक्ती रस्ता अपघातात दगावल्यास ती व्यक्ती उर्वरित आयुष्यात किती कमाई करू शकली असती, हे ध्यानात ठेवून तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्याची गरज असते, असे नमूद करून रस्ता अपघात नुकसान भरपाई लवादाचे अध्यक्ष इर्शाद आगा यांनी एका खलाशाच्या कुटुंबीयांना 3.11 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

पूलवाडो- बाणावली येथील आसिस फिग्रेदो (47) या खलाशाचा होन्नावर येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्याची पत्नी मारिया आणि पुत्र अँथनी, एलरॉय यांनी या लवादासमोर दावा दाखल केला होता. त्यांच्या वतीने ॲड. आंतोनियो क्लोविस यांनी लवादासमोर बाजू मांडली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, एका विदेशी जहाजावर काम करणारे फिग्रेदो हे कामावर सुट्टी घेऊन गोव्यात आले होते. वालंकिणी सायबिणीच्या दर्शनासाठी स्वत:च्या वाहनाने तामिळनाडूला जाताना 27 ऑगस्ट 2012 रोजी होन्नावर येथील राष्ट्रीय हमरस्त्यावर भर वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या गाडीला दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी विमा कंपनीने त्यांच्या कुटुंबीयांना तात्पुरती सानुग्रह मदत म्हणून फक्त 70 हजार रुपये दिले होते.

फिग्रेदो ही घरातील एकुलती एक कमावती व्यक्ती असल्याचा दावा करून त्यांच्या कुटुंबीयांनी लवादासमोर दावा दाखल केला असता, हा अपघात फिग्रेदो यांच्या चुकीमुळे झाला, असा दावा करून विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नाकारले होते. मात्र, फिग्रेदो यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात झाला त्यावेळी कर्नाटक येथील पोलिसांनी चुकीचा पंचनामा केल्याचे लवादासमोर सिद्ध केल्याने आणि हा दावा खोडून काढण्यासाठी त्या टेम्पोचालकाला न्यायालयात हजर करणे विमा कंपनीला शक्य न झाल्याने लवादाने हा निकाल दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT