The Sea Plane of SpiceJets landed again in mandvi river
The Sea Plane of SpiceJets landed again in mandvi river 
गोवा

स्पाईस जेटचे 'सी प्लेन' चे पर्यटनाच्या नकाशावर गोव्याला स्थान देण्यासाठी प्रयत्न

दैनिक गोमन्तक

पणजी: महिनाभरात दुसऱ्यांदा स्पाईस जेटचे सी प्लेन मांडवी नदीत उतरले. देशभरातील ‘सी प्लेन’ पर्यटनाच्या नकाशावर गोव्याला स्थान देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पाण्यात उतरविण्याच्या विमानांसाठी मांडवी नदी किती सुरक्षित आहे याची चाचणी करण्यात येत आहे.


हे विमान दुपारी मांडवी नदीत उतरल्यानंतर ते जुन्या सचिवालय इमारतीसमोरील धक्क्याशेजारी उभे होते. ते पाहण्यासाठी धक्क्‍यालगत पर्यटकांनी गर्दी केली होती. तेथून जाणारेही वाहनांचा वेग मंदावत मान वळवून विमान पाहत होते. सुरवातीला तेथे एखादी नौका नांगरून ठेवली की काय असे दुरून वाटत होते.


महाराष्ट्रातील काही पर्यटन ठिकाणांच्या ठिकाणी अशी विमाने उतरवण्याचा सराव करण्यात आला आहे. गुजरातेत अशी विमाने उतरवण्यात येतात. ही सारी पर्यटन स्थळे अशा पाण्यातील हवाई मार्गाने जोडण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर केला जात आहे. देशाच्या इतर भागातील पर्यटन स्थळी असलेले पर्यटक या माध्यमातून थेटपणे गोव्यात येण्याचे नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि केंद्रीय हवाई वाहतूक सुरक्षा महासंचालनालयाच्या परवानगीनंतरच ही सेवा सुरु होणार आहे. यात पर्यटन खात्याची भूमिका नेमकी काय असेल हे अद्याप समजलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT