Bicholim Cemetery Dainik Gomantak
गोवा

Bicholim Cemetery: स्मशानभूमीतील भंगार साहित्याची चोरी करून, परस्पर विकले; माजी पंचावर संशय

Bicholim Cemetery: प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन डिचोली पोलिसांनी मेघःश्याम राऊत तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले.

Pramod Yadav

Bicholim Cemetery

राज्यात सध्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोर कोणत्या साहित्याची आणि कोठून चोरी करतील, याचा नेम नाही. साळ पंचायत क्षेत्रातील पुनर्वसन वसाहतीतील शासकीय स्मशानभूमीतील किमती भंगार साहित्याची चोरी करून, ते परस्पर विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

यासंबधी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते मेघः श्याम राऊत यांनी शुक्रवारी (ता.३१) डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात एका माजी पंचसदस्याचा हात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या पंचसदस्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन डिचोली पोलिसांनी मेघःश्याम राऊत तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले.

लोखंडी रॉड, पत्रे गायब

साळ येथील पुनर्वसन वसाहतीतील सर्व्हे क्र. १३०/१-ए या जमिनीत असलेल्या शासकीय स्मशानभूमीचे विकसित काम करण्यात येत आहे. स्मशानभूमीचे पूर्वीचे लोखंडी रॉड, पत्रे आदी भंगार साहित्य स्मशानभूमीत ठेवण्यात आले होते.

हे साहित्य आता तेथून गायब झाले आहे. साधारण दोन ते तीन लाख रुपये किमतीचे पूर्वीचे हे साहित्य चोरून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT