Farm Dainik Gomantak
गोवा

Old Goa: कोण म्हणतं शेती परवडत नाही; एकात्मिक शेती फायद्याची! 

एकात्मिक शेती पद्धती आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्यासाठी उपयुक्त असून अल्पभूधारकांना ती फायद्याची ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजीत स्वयंपोषी विकासासाठी एकात्मिक शेती फायदेशीर ठरत असून राज्यातील अनेक अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेत आहेत, अशी माहिती केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. परमेश (Dr. Parmesh, Senior Scientist) यांनी दिली.

एकात्मिक शेती या विषयावर डॉ. परमेश अनेक वर्षांपासून जुने गोवे येथील संशोधन केंद्रात संशोधन करत आहेत. डॉ.  परमेश म्हणाले, एकात्मिक शेती म्हणजे शेतीमधील मूळ पिकांसोबत भाजी, फुले उत्पादन, गाई-म्हशीपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, वनशेती, मत्स्य, वराहपालन, मधमाशीपालन यासारख्या पूरक शेती व्यवसायांचा अंतर्भाव करून शेती करणे.

जुने गोवेतील केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्थेत किनारपट्टी भागासाठी दोन पद्धतीचे मॉडेल उभे करून त्यावर संशोधन सुरू आहे. किनाऱ्यालगत सखल भागातील शेती आणि डोंगराळ भागातील शेती. या दोन्ही ठिकाणी केलेले एकात्मिक शेतीचे प्रयोग यशस्वी झाले असून अल्पभूधारकांना वर्षाकाठी 1.60 ते 1.80 लाखांचा नफा मिळाला .

सध्या सगळीकडे सांगितले जाते, की शेती परवडत नाही. मात्र, डॉ. परमेश यांनी तयार केलेल्या मॉडेलच्या आधारे शेती केल्यास अल्पभूधारक शेतकरीसुद्धा चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊ शकतो, हे संशोधनाअंती सिद्ध केले आहे.

एकात्मिक  शेती प्रणालीचे फायदे-

* खते आणि कीटकनाशकांचा मर्यादित वापर

* वर्षभर चाऱ्याची उपलब्धता

* हरित खत आणि अवशेषांच्या पुनर्वापराद्वारे माती सुपीकते वाढ

* पशुधनासाठी खाद्य खरेदीत घट

* सुधारित भाजीपाला आणि कडधान्य उत्पादन

* अन्न, पौष्टिक सुरक्षा आणि शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न

डॉ. परमेश, वरिष्ठ शास्त्रज्ञ: एकात्मिक शेती पद्धती आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्यासाठी उपयुक्त असून अल्पभूधारकांना ती फायद्याची ठरत आहे. या शेतीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूरक व्यवसायाची जोड दिल्यास त्याचा फायदा कुटुंबाला होतो, याशिवाय स्वयंपूर्णतेच्या दृष्टीनेही लाभ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Soha Ali Khan: 'गर्ल गँग'सोबत सोहाची पूलसाईड धमाल, गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर हिट!

साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

Dovorlim: दवर्लीत पुन्हा नाट्यमय घडामोड! सरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला; भाजपला दणका

Goa Today News Live: गोव्यात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT