गोवा: राज्यात कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले शैक्षणिक वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. संबंधीत निर्णय आज जाहिर करण्यात आला असुन, उद्यापर्यंत परिपत्रक जारी होणार आहे. 1 ली ते 12 वी पर्यंतचे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात येणार आहेत, राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेण्यात आला अहे. (Schools in goa to reopen on Monday)
कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या संसर्गामुळे तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारने शिक्षण खात्याला सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणारे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. हा आदेश 15 फेब्रुवारीपर्यंत लागू राहिल असे सांगण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीला नवा अध्यादेश निघणे अपेक्षित होते. मात्र, 17 फेब्रुवारी ही तारीख उजाडली तरी अद्याप शाळांबाबत निर्णय झालेला नव्हता.
केंद्र सरकारने राज्यावर निर्णय सोपवला
राज्यांनी आपापल्या राज्यातील कोविड स्थितीची अवलोकन करून यासंबंधीच्या निर्बंधांचे निर्णय घ्यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी केली होती. आरोग्य खात्याच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की सध्या देशभरात कोरोनाची स्थिती सुधारत आणि कमी होताना दिसत आहे. त्यामुळे यासंबंधीची नियम आणि अटींचे निर्णय राज्य सरकारने घ्यावेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.