देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच गोव्यातही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेजारील राज्यांमध्ये पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूसारखे निर्बंध लावण्यास सुरुवात झाल्याने गोव्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय राज्यातील नेतृत्व घेणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे.
टास्क फोर्स बैठक
येत्या 3 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या टास्क फोर्सची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वीच डॉ. धनेश वळवीकर यांनी राज्यातील 12 पर्यंतच्या शाळा (Goa Schools) आणि कॉलेज 15 दिवसांसाठी बंद करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाईट कर्फ्यूची (Night curfew) देखील शिफारस त्यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी याआगोदरच स्पष्ट केले होते की, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने सर्व गोष्टींचा विचार करुनच नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र आता 3 जानेवारीला होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीकडे गोमन्तकींयांचं लक्ष लागले आहे.
नव वर्षाचं स्वागत
नवं वर्षाची चाहूल लागली असताना दुसरीकडे कोरोनाच्या धोका जाणवत आहे. राज्यात समुद्रकिनारी नागरिकांची रेलचेल पाहायला मिळत असल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून हॉटेल, पब, रेस्टारंटमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होताना दिसत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोना नियमांची अंमलबजावणी होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.