Goa School Reopening Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सोमवारपासून शाळा सुरू; सर्व शाळांना नियमांचे पालन बंधनकारक

गोवा राज्याचे शिक्षण संचालक भूषण सवाईकर (Bhushan K Savaikar) यांनी शाळांना नियमित वर्ग सुरू करण्याची सूचना केली असून, कोरोना नियमावलींचे पालन करणे शाळांना बंधनकारक असणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa School Reopening: संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. गोवा सरकारने 21 फेब्रुवारीपासून सर्व शाळा (Schools) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात इयत्ता 1 ते 12 पर्यंतचे ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू होतील. गोव्यात कोविड-19 च्या (Corona) रुग्णांमध्ये घट होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (School starts in Goa from Monday Compliance with the rules is mandatory)

गोवा सरकारतर्फे शाळा सुरू करण्याचे आदेश जाहीर

गोवा राज्याचे शिक्षण संचालक भूषण सवाईकर (Bhushan K Savaikar) यांनी शाळांना नियमित वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. सोमवारपासून राज्यात पुन्हा पाहिल्यासारखे वर्ग सुरू होणार आहेत. त्याचबरोबर सर्व शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. आदेशानुसार, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू केल्या जाणार आहे. दरम्यान, कोरोनासंबंधी उपापयोजना आणि नियमावलीचे पालन करण्याचे सर्व शाळांना निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT