Goa Government Job Scam  Dainik Gomantak
गोवा

Goa Job Scam: पूजा नाईकचे 'पॉलिटिकल कनेक्शन' समोर! 'मास्टरमाईंड' महिलेचा शोध सुरु; एका मुख्याध्यापिकेचाही सहभाग

Government Job Scam : फसवणूक प्रकरणाचे शेपूट वाढत असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पूजा नाईक ही एका प्रादेशिक पक्षाशी संबंधित असल्‍याचेही समोर आले आहे. त्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांच्‍या मेहेरबानीतून तिने काही जणांना नोकऱ्या लावल्‍या असल्‍याचेही बोलले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Government Job Fraud Cases Rise Principal Arrested

पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. पूजा नाईक हिने दोन अधिकाऱ्यांच्‍या साह्याने काहीजणांना नोकऱ्या दिल्‍याचेही उघड झाले आहे.

शिक्षिकेची नोकरी देतो असे सांगून १५ लाख रुपयांना फसवलेल्या आयआरबी पोलिस सागर सुरेश नाईक याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात माशेल येथील एका विद्यालयाची मुख्याध्यापिका सुनिता शशिकांत पावसकर (वय ५६) हिला पोलिसांनी अटक केली.

फसवणूक प्रकरणाचे शेपूट वाढत असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पूजा नाईक ही एका प्रादेशिक पक्षाशी संबंधित असल्‍याचेही समोर आले आहे. त्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांच्‍या मेहेरबानीतून तिने काही जणांना नोकऱ्या लावल्‍या असल्‍याचेही बोलले जात आहे. आत्तापर्यंत गेल्‍या आठ दिवसांत दहा जणांवर गुन्‍हे, तर एका महिलेला नोटीस बजावण्‍यात आली आहे. या प्रकारातील बहुतेक जण हे फोंडा तालुक्‍यातील असल्‍याने आश्‍‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे स्‍पष्‍ट केले आहे.

दीपश्री आमिष दाखवायची, सागर नाईक सावज हेरायचा

फसवणूक प्रकरणी माशेल येथील एका विद्यालयाची मुख्याध्यापिका सुनिता शशिकांत पावसकर (वय ५६) हिला अटक झाल्यानंतर फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा काही अटींवर तिचा जामीन मंजूर केला. आरोग्याच्या कारणावरून तिला हा जामीन मंजूर झाला आहे. सुनिता पावसकर ही तिवरे - माशेल येथे राहते. यावेळी न्यायाधीशांनी तिला सात दिवस फोंडा पोलिस स्थानकात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

पोलिसांशी तपासादरम्यान सहकार्य करण्याची ताकीदही तिला देण्यात आली आहे. दरम्‍यान, या प्रकरणातील आणखी एका महिलेच्या शोधात फोंडा पोलिस आहेत. ही महिला सध्या बेपत्ता झाल्याने पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. ही बेपत्ता महिला माशेल येथील रहिवासी असून तिचे नाव दीपश्री सावंत गावस असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. उसगाव येथील महिलेला माशेल येथील एका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष दाखवून या महिलेकडून आयआरबी पोलिस असलेल्या सागर नाईक याने १५ लाख रुपये घेतले होते. मात्र, सागर नाईक हा मिडिएटर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील मास्टरमाईंड ही दीपश्री सावंत गावस आहे. तीच नोकऱ्यांसाठी आमिष दाखवायची आणि मग सागर नाईक हा सावज हेरायचा. वास्तविक त्या विद्यालयात शिक्षिकेची जागा खाली झाली होती. मात्र, पैसे दिलेल्या महिलेला ती जागा मिळाली नाही. त्यामुळेच हे प्रकरण शेवटी पोलिसांत पोचले. दीपश्री सावंत गावस या महिलेने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना नोकरीसाठी पैसे घेऊन फसवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सागर नाईक याला अटक केल्यानंतर आपल्यालाही पोलिस अटक करतील, या भीतीने दीपश्री लपून राहिली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT