PM Modi Goa Visit Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit: पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा, मडगावातील शाळांना सुट्टी जाहीर

पंतप्रधान मोदींच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण संचालनालयाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pramod Yadav

PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. मोदी या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, मडगाव येथील जाहीर सभेला ते संबोधित देखील करतील.

पंतप्रधान मोदींच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण संचालनालयाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सहा फेब्रुवारी रोजी मडगावमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मोदींचा दौरा आणि मडगावमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत व्हावी किंवा त्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शाळा बंद ठेण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगावातील सभेला किमान 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मोदींची होणारी ही सभा राजकीय नसल्याचा उल्लेख देखील सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असेल त्याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर येत असल्याने एक दिवस विधानसभेचे कामकाज देखील बंद ठेवले जाणार आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.

अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत 08 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशानात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT