Parshottam Rupala Dainik Gomantak
गोवा

Sagar Parikrama: सागर परिक्रमा कार्यक्रमातर्फे मच्छीमारांना बोटी देण्याची योजना; मंत्री रूपाला यांची माहिती

सागर परिक्रमाअंतर्गत मच्छीमारांशी संवाद

दैनिक गोमन्तक

Sagar Parikrama: मासेमारीसाठी मच्छीमारांना बोटी देण्याची योजना असून त्यांना किसान कार्डही उपलब्ध आहे. केवळ ७ टक्के व्याज आकारले जाते. जर मच्छीमारांनी हप्ते व्यवस्थित भरले तर केंद्र सरकारतर्फे जादा सवलत मिळते, अशी माहिती सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्या अंतर्गत केंद्रीय मच्छीमारी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांनी दिली.

वास्कोत त्यांनी मच्छीमारी जेटीची पाहणी केली. त्यानंतर मडगावमध्ये मच्छीमार व्यवसायासंबंधीत व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सविताबेन रूपाली, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार वेन्झी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा उपस्थित होते.

मच्छीमारी उद्योगात पुरुषांबरोबर महिलांचाही तेवढाच हात असतो, हे आपल्याला सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या वेळी ध्यानात आले. त्यामुळे लहान मच्छीमारांना व्यापाराची सुविधा व मासळी निर्यात करण्याची संधी देताना महिलांचे बचत गट सुरू करून त्यांच्यासाठीसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असेल. मच्छीमारांनासुद्धा मूल्यवर्धित कर (व्हॅट) भरावा लागतो. हा कर कमी करावा, अशी मागणीही आपल्याकडे आली आहे. पण हा संपूर्ण भारतातील मच्छीमारांचा प्रश्र्न आहे. त्यामुळे आपण देशातील सर्व भागातील मच्छीमारांशी चर्चा करून तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करून त्या संदर्भात केंद्र सरकार निर्णय घेईल, असेही मंत्री रुपाला म्हणाले.

सुविधा उपलब्ध करा

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी लहान व पारंपरिक मच्छीमारांसाठी स्टोरेज सिस्टम, इंधनावरील मूल्यवर्धित कराची भरपाई देणे किंवा परतावा द्यावा, साळ नदीच्या समुद्राकडील भागात मच्छीमारांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

SCROLL FOR NEXT