Goa Paragliding Accident Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Paragliding Accident: गोवा पॅराग्लायडिंग अपघाताचा व्हिडिओ आला समोर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारी दृष्ये Viral Video

Goa Paragliding Accident Viral Video: पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Pramod Yadav

Goa Paragliding Accident Viral Video

पणजी: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दोरी अचानक तुटल्याने पुण्यातील पर्यटक तरुणी आणि नेपाळच्या पायलटचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. केरी (पेडणे) येथे समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे हा अपघात झाला होता.

केरी येथे झालेल्या अपघातात पुण्यातील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले होते. यामुळे राज्यातील पॅराग्लायडिंग व्यावसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असाताना हा अपघात नेमका झाला कसा? याचा काळजा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

मृत शिवानी तिच्या पतीसोबत हनिमूनसाठी गोव्यात आली होती, असा दावा केला जात आहे. पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे ते गेले होते. यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

दरम्यान, हरमल तसेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पॅराग्लायडिंगला आमचा विरोध असून तशा प्रकारचा ठराव मंजूर करूनही सरकारने अशा पॅराग्लायडिंग व्यवसायिकांना परवाने का दिले? कुणाला परवाने दिले? याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT