Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: चुरस वाढली लोकसभेसाठी सावळ यांची चर्चा

Goa Politics: चुरस वाढली: कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे रिंगणात उतरण्याची

दैनिक गोमन्तक

Goa Politics: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वारे हळूहळू तापू लागले आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली असून चूरसही वाढू लागली आहे.

या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माजी आमदार नरेश सावळ यांचे नाव पुढे येत असून, डिचोलीसह मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चाही सुरू आहे.

त्यातच त्यांच्या फोटोसह गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर विविध ठिकाणी झळकल्याने या चर्चेला महत्त्व तेवढेच वजन प्राप्त झाले आहे.

दुसऱ्या बाजूने कार्यकर्त्यांचा आग्रह आणि एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच उतरणार, अशी ''सिंहगर्जना'' नरेश सावळ यांनी केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्याच मतांनी विजयश्रीने हुलकावणी दिल्यानंतर नरेश सावळ यांचे अंतर्गत कार्य चालूच होते. प्रत्यक्षात मात्र ते राजकारणापासून काहीसे अलिप्त होते.

भाजप की काँग्रेस?

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ हा अजूनतरी भाजपसाठी सुरक्षित आणि अनुकूल आहे. गेल्या पाच लोकसभा निवडणुकीपासून या मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.

विद्यमान केंद्रीयमंत्री श्रीपाद (भाऊ) नाईक हे या मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आले आहे.

यावेळी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सुरू होती, ते सदानंद शेट तानावडे हे खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे श्रीपाद नाईक यांचा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता नरेश सावळ यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार, की ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार. त्याबद्दल उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे.

राजकीय कारकीर्द

2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेश सावळ हे प्रथमच डिचोलीतून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत गेले. २०१७ आणि २०२२ साली मिळून झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत नरेश सावळ यांनी मगोच्या उमेदवारीवर डिचोली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांना विजयाने हुलकावणी दिली होती. दोन्ही निवडणुकीत त्यांना अवघ्याच मतांनी हार पत्करावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT