सांगे : साळावली धरणग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न आहे. जर लोकांनी आपल्याला निवडून आणले, तर आपण समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देईन. इमारती उभ्या केल्या म्हणजे विकास होत नाही. प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी आपला प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच सांगे मतदारसंघात (Constituency) मतदारांच्या मनातील विकास केला जाईल. आपल्या समर्थानात दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे परिश्रम आपण वाया जाऊ देणार नाही. सांगेमधून भाजपाची (BJP) उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा दावा सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी केला.
भाजपा महिला मोर्चा राज्य उपाध्यक्ष सावित्री कवळेकर यांनी वाडे कुर्डी आणि भाटी अशा दोन पंचायत क्षेत्रातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांगे मतदारसंघातील एकूण 46 मतदान केंद्रातील कार्यकर्त्यांचे पाच ठिकाणी मेळावे आयोजन करून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. कार्यकर्त्यांच्या पहिल्याच मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहून आपण भारावून गेल्याचे सावित्री कवळेकर यांनी सांगितले. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या समर्थानात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी त्यांच्यासोबत सांगे भाजपा मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, उपाध्यक्ष सदानंद गावडे, एसटी मोर्चाचे अध्यक्ष महेश गावकर, वाडे कुर्डीचे उपसरपंच कुष्ठ गावकर, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, नानू भांडोळकर, चंदन उनंदकर, संतोष नाईक, चंद्रकांत गावकर, भाटीचे पंच मनोज पर्येकर, वाडे कुर्डीचे पंच जानू झोरे, उगेचे माजी सरपंच संतोष गावकर, प्रशांत गावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक, नगरसेवक मेशु डिकॉस्ता, महेश गावकर, चंदन उनंदकर, मनोज पर्येकर, चंद्रकांत गावकर, कुष्ठ गावकर, विठोबा गावकर, नानू भांडोळकर यांनी विचार व्यक्त केले. प्रशांत गावकर यांनी सूत्रसंचालन, संतोष गावकर यांनी आभारप्रकटन केले. मेळाव्याला तीनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.