Savita Tavadkar files nomination  Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election: सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर यांचा उमेदवारी अर्ज

पैंगीण पंचायतीच्या आमोणे वार्डातून भरला उमेदवारी अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: सभापती रमेश तवडकर (Ramesh Tavadkar) यांच्या पत्नी सविता तवडकर (Savita Tavadkar) पैंगीण पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज आज (दि.25) भरला. सविता तवडकर यांनी आमोणे वार्डातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉ.पुष्पा अय्या उपस्थित होत्या.

सविता तवडकर बलराम शिक्षण संस्थेच्या आमोणे येथील श्री बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. प्रथमच त्या पंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काणकोणातील यंदा तीन पंचायती महिला सरपंच पदासाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. सात पैकी पैंगीण,लोलये व श्रीस्थळ या पंचायतीच्या पंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी राखीव ठेवण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, सध्या गोव्यात सर्वदूर पंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. प्रतिष्ठीत राजकारणी यांची मुले देखील या निवडणूकीत नशीब आजमावून पाहत आहेत. आमदार मायकल लोबो व डिलायला लोबो या दाम्पत्याचा पुत्र डॅनियल लोबो यांनी पंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळे यावेळची पंचायत निवडणूक रंजक होणार असं दिसतयं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT