Old Goa Master Plan Canva
गोवा

वारसा वाचवण्यासाठी वेळ द्या! Old Goa Master Plan साठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

Save Old Goa Committee: वारसा नष्ट करून प्रकल्प आणल्यास याचे परिणाम पर्यटनावर होणार आहेत, अशी चिंता पीटर व्हिएगस यांनी व्यक्त केली

गोमन्तक डिजिटल टीम

Save Old Goa Action Committee

तिसवाडी: जुने गोवे या जागतिक वारसा स्थळाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यंदा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचा दर्शन सोहळा सुमारे दीड महिने चालणार असल्याने तत्पूर्वी जुने गोवा मास्टर प्लान तयार करून लागू करा, अशी मागणी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यासंदर्भात निवदेन सादर करण्यात आले असून आठ दिवसांत बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना करण्यात आली.

जागतिक वारसा स्थळ असल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंर्तगत येणारे स्मारकांसाठी ३०० मीटर, तर राज्य पुरातत्व खात्या अंतर्गत येणाऱ्या स्मारकांसाठी १०० मीटर बफर झोन निश्चित केला असून आत्ता मागच्या दाराने मोठे प्रकल्प आणले जात आहेत. ही गोष्ट धक्कादायक आहे, कारण जुने गोवे हा वारसा दर्जाचा गाव असल्याने येथे लाखो पर्यटक येतात. वारसा नष्ट करून प्रकल्प आणल्यास याचे परिणाम पर्यटनावर होणार आहेत, अशी चिंता पीटर व्हिएगस यांनी व्यक्त केली.

जुने गोवेतील १२ प्रकल्पांना विरोध : जुने गोवे येथील एकूण १२ प्रकल्पांना विरोध केला गेला आहे. १. चार फार्म हाऊस प्रत्येकी दहा पलंगासह, २. तरंगती जेटी आणि प्रस्तावित सागरमाला जेटी, ३. बेकायदेशीर बंगला आणि इतर बांधकाम, ४. सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपलच्या भिंतीच्या बाजूला बेकायदेशीर रस्त्याचे बांधकाम, ५. वारसा व्याख्या केंद्र, ६. कचरा व्हिलेवाट प्रकल्प, ७. चॉकलेट प्रदर्शन केंद्र, ८. २१ गायब घरांना क्रमांक, ९. आयपीबी लेटराईट रिसॉर्ट, १०. सर्वेक्षण क्रमांक ६८/१ – सी आणि ६५/3 यात झालेले जमीन रूपांतर, ११. मडकईकर इस्टेटसह बंगला आणि १२. हेलिपॅड (ध्वनी प्रदूषण).

मोठे बंगले, पर्यावरणपूरक प्रकल्प यांच्या नावाआड मोठे हॉटेल आणण्याच्या कट रचला जात आहे. यात सरकारकडून हे प्रकल्प प्रस्तावित केले जात असल्याने वारसा स्मारकांना क्षती पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे.
पीटर व्हिएगस, सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समिती
जुने गोवेत मूलभूत सुविधा देणे सरकारला शक्य होत नाही. त्यात मेगा प्रकल्प आणून सरकार जुने गोवेचे अस्तित्व नष्ट करणार आहे. हे त्वरित थांबवून मास्टर प्लान लागू करण्यात यावा.
ग्लेन काब्राल, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT