Heritage Master Plan
पणजी: जुने गोवे वाचविण्यासाठी आणि वारसास्थळ म्हणून कायमस्वरूपी ओळख जपून ठेवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीने पुढाकार घेतला आहे. सरकारला आणि संबंधित खात्याला निवेदन देखील दिले आहे. जर सरकारने निवेदन मान्य करून जुने गोव वाचवण्यासाठी बफर झोनच्या सीमांकनासह प्रदर्शनापूर्वी हेरिटेज मास्टर प्लॅन तयार केला नाही, तर गोव्यातील जनतेला सोबत घेऊन सरकार विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे.
समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीटर व्हिएगस यांनी सांगितले की, ओल्ड गोवा वारसा स्थळात अनेक बेकायदेशीर प्रकल्प आणि बांधकामे उभारली आहेत. अजून काही प्रकल्पांना परवानगी देखील देण्यात आली आहे. ओल्ड गोवा हे गोव्यातील एकमेव युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. ते जपून ठेवण्याचे काम सरकारचे आहे, पण सरकारच्या भूमिका वारसा स्थळ जपण्याच्या विरोधात आहेत. सरकारने आपले निर्णय मागे घेऊन या ठिकाणी ज्यांना बांधकाम आणि व्यवसायाला परवानगी दिली आहे ती परवानगी रद्द करावी.
प्रदर्शनापूर्वी हेरिटेज मास्टर प्लॅन तयार करण्याचे निवेदन मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष, नागरनियोजनमंत्री विश्वजीत राणे, ओल्ड गोवा पंचायत आणि मुख्य नगर नियोजकाला देण्यात आल्याची माहिती व्हिएगस यांनी दिली. ते म्हणाले की, याच वारसास्थळात प्रत्येकी १० शयनकक्षांसह ४ फार्म हाऊसना परवानगी दिली आहे. तसेच जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय करण्यासाठी १०० मीटर पाण्याच्या टाकीची परवानगी देखील देण्यात आली आहे. ही पाण्याची टाकी नसून तेथे स्विमिंग पूल बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीटर व्हिएगस यांनी ओल्ड गोवा पंचायतीवरही आरोप केला. व्हिएगस यांनी सांगितले की, एसएफएक्स चॅपलच्या भिंतीपासून अंतर न ठेवता बेकायदेशीर रस्त्याचे बांधकाम पंचायतीने केले आहे. याच वारसास्थळात हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर येणार आहे. वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आणि नामांकित असताना असे प्रकल्प याच ठिकाणी कशे उभारले जाऊ शकतात? येथे उभारण्यात आलेला बेकायदेशीर बंगला अजूनही तसाच आहे हॉटेलला दिलेली परवानगीदेखील अजून रद्द केली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.