Save Goa Save Tiger Dainik Gomantak
गोवा

गोव्‍याच्‍या भावी पिढ्यांवर अन्‍याय करणाऱ्या राणेंकडून वनखाते काढून घ्‍या; राजन घाटेंची मागणी

‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ सर्व पातळ्‍यांवर लढणार

दैनिक गोमन्तक

Save Goa Save Tiger : स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी गोव्‍याच्‍या पंधरा लाख लोकांसह त्‍यांच्‍या भावी पिढ्यांवर अन्‍याय करणारे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍याकडून वनखाते काढून घ्‍यावे, अशी मागणी ‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ संघटनेच्‍या वतीने संयोजक राजन घाटे यांनी केली आहे.

आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्‍येष्‍ठ पर्यावरण अभ्‍यासक प्रा. राजेंद्र केरकर, प्रतिमा कुतिन्‍हो उपस्‍थित होत्‍या.

घाटे म्‍हणाले, म्‍हादईच्‍या संरक्षण आणि समर्थनासाठी म्‍हादई अभयारण्‍य वनक्षेत्र बनणे गरजेचे होते. म्‍हणूनच आम्‍ही वेगवेगळ्‍या पातळ्‍यांवर कर्नाटकाशी लढत होतो. म्‍हादईचा गळा घोटू पाहणाऱ्या कर्नाटकाला या मार्गाने विरोध करणे अत्‍यंत सोपे असताना राज्‍य सरकारने कोर्ट-कचेऱ्या खेळत जनतेच्‍या कराचे कोट्यवधी रुपये खर्च केले. त्‍याऐवजी हे क्षेत्र व्‍याघ्रक्षेत्र झाले असते तर कर्नाटकाला कळसा-भांडुरा प्रकल्‍प पुढे नेताच आला नसता.

आता लोकभावनेबरोबर उच्च न्‍यायालयाने राज्‍य सरकारला दणका देऊन पुढील तीन महिन्‍यांत हे क्षेत्र व्‍याघ्रप्रकल्‍प म्‍हणून घोषित करण्‍याचे निर्देश दिले आहेत. आता मुख्‍यमंत्र्यांनी याची तातडीने अंमलबजावणी करावी.

याउलट हा प्रश्‍‍न सर्वोच्च न्‍यायालयात नेला जाईल अशी भाषा करणाऱ्या आणि निसर्गाच्‍या विरोधात काम करणाऱ्या वनमंत्र्यांकडून खाते काढून घ्‍यावे. याबरोबरच वनमंत्र्यांना साथ देणाऱ्या त्‍यांची पत्‍नी दिव्‍या राणे यांच्‍याकडून वनविकास महामंडळही काढून घ्‍यावे, असेही घाटे म्‍हणाले.

बफर झोनमध्‍ये लोकवस्‍ती चालते : केरकर

गोव्‍याला वाघ नवा नाही. इथल्‍या जंगलांमध्‍ये तो प्राचीन काळापासून वास्‍तव्‍य करून आहे. बेसुमार शिकारींमुळे वाघांची मोठ्या प्रमाणात हत्‍या करण्‍यात आली. गोव्‍यात वाघांची हत्‍या सुरूच आहे.

म्‍हादई व्‍याघ्रप्रकल्‍पाबाबत अनेक गैरसमज असून केवळ कोअर झोनमध्‍ये लोकवस्‍ती नको असते, मात्र बफर झोनमध्‍ये लोक राहू शकतात, त्‍यांचे दैनंदिन व्‍यवहार करू शकतात. केवळ मोठ्या प्रकल्‍पांना निर्बंध असतात.

त्‍यांनी स्‍वत:च्‍या खर्चाने न्‍यायालयात जावे

म्हादईच्‍या न्‍यायालयीन लढ्यासाठी राज्‍य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आता यापुढे कोर्ट-कचेऱ्यांसाठी सामान्‍य माणसांच्‍या कराचे पैसे वापरले जाऊ नयेत.

व्‍याघ्रप्रकल्‍पासंबंधी सर्वोच्च न्‍यायालयात दाद मागायची असेल तर मंत्रीमहोदयांनी स्‍वत:च्‍या पैशाने 100 वकिलांची फलटण घेऊन लढावे. आम्‍ही आमचा म्‍हादईच्‍या संरक्षणाचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे राजन घाटे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT