Crime, Murder, Suspect Canva
गोवा

Goa Crime: रूपा पारकर खूनप्रकरणी संशयिताला जामीन नाहीच

Goa Crime News: या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी ६ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: करमणे - सावर्डे येथील रूपा पारकर या महिलेच्या खूनप्रकरणी अद्याप आरोप निश्चित करणे बाकी आहे. तसेच साक्षीदारांचा न्यायालयात जबाब नोंदवणे आवश्यक आहे. याशिवाय तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्याची दखल घेतल्यास निर्दयीपणे हत्या करण्यात आली. तसेच अपराधी सापडू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने संशयित हुसेन खान याचा जामीन फेटाळून लावला. याबाबतचा निवाडा न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी दिला आहे.

या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी ६ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार गुड्डेमळ - सावर्डे येथील रस्त्याच्या बाजूला जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह करमणे - सावर्डे येथील रुपा पारकर हिचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

याच दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तसेच साक्षीदारांचा जबाब नोंद करून १४ मे २०२२ रोजी संशयित हुसेन खान या ट्रकचालकाला अटक केली होती. संशयित हुसेन खान याने दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर संशयिताने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT