Communidade Land Dainik Gomantak
गोवा

Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

Sauvevere comunidade illegal houses: सावईवेरे कोमुनिदादच्या जमिनीतील पाच घरांचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असून ही घरे पाडण्याचा आदेश फोंड्याच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे.

Sameer Amunekar

फोंडा: सावईवेरे कोमुनिदादच्या जमिनीतील पाच घरांचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असून ही घरे पाडण्याचा आदेश फोंड्याच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. तरीपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असून आम्ही कुणाच्या हिताआड नाही, पण बेकायदेशीर घरे बांधणाऱ्यांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करणे तेवढेच गरजेचे आहे, असे सावईवेरे कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आम्ही आदर करतो, पण त्यांना सावईवेरे येथील बेकायदेशीर घरांसंबंधी योग्य माहिती दिलेली नाही. गेल्या १९९२ पासून या बेकायदा घरांचा प्रश्‍न न्यायालयात आहे. आता त्यावर निकालही आला आहे.

त्यामुळे आम्ही न्यायालयाचाही आदर करतो, असे कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सावईवेरे कोमुनिदादतर्फे सामाजिक कार्यासाठी पंचायत तसेच इतरांनाही जमीन दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी सावईवेरे कोमुनिदादचे ॲटर्नी पंढरीनाथ चाफाडकर, अध्यक्ष एकनाथ सावईकर, खजिनदार विजयकुमार सावईकर तसेच सुभाष शिलकर व नारायण म्हातारभोग, हेमंत कथने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

SCROLL FOR NEXT