Sattari Rain  Dainik Gomantak
गोवा

Sattari Rain : सत्तरी, डिचोलीला पावसाने झोडपले; पाच ठिकाणी पडझडीच्या घटना

Sattari Rain : वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसावेळी रात्री नऊ वाजेपर्यंत पडझड झाल्याचे पाच कॉल नोंद झाल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली. माठवाडा-पिळगाव येथे आनंद कवळेकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Rain :

डिचोली, अवकाळी पावसाने गुरुवारी सर्वत्र झोडपून काढले. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह रात्री डिचोलीत सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. पाच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

वीज पुरवठाही खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. रात्री साडेआठ वाजेपर्यंत सर्वत्र काळोख होता. नंतर वीज पुरवठा सुरळीत झाला तरी उशिरापर्यंत विजेची लपाछपी सुरु होती.

गेल्या आठवड्यापासून रोज संध्याकाळनंतर अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. गुरुवारी पावसाने कहर केला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे सुटले. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. साधारण तासभर जोरदार पाऊस पडला. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. मुसळधार पावसामुळे नोकरी धंद्यावरून घरी परतणारे लोक अडकून पडले. रस्ते जलमय झाले.

मुस्लिमवाडा आदी काही भागात गटारे तुंबून गटारातील माती आदी कचरा रस्त्यावर वाहून आला. वाहतुकीवरही परिणाम झाला. डिचोलीतील ग्रामीण भागातही वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.

पिळगावात घरावर झाड कोसळले

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसावेळी रात्री नऊ वाजेपर्यंत पडझड झाल्याचे पाच कॉल नोंद झाल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली. माठवाडा-पिळगाव येथे आनंद कवळेकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळले. झाडाखाली पार्क केलेली दोन वाहने मात्र सुरक्षित राहिली.

न्हावेली येथेही तीन ठिकाणी वीजवाहिन्या तोडून झाडे रस्त्यावर कोसळली. अन्य एका घटनेत कारापूर येथेही रस्त्यावर झाड पडले. या पडझडीत एक लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेची वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. अन्य कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

SCROLL FOR NEXT