Sattari Swachhata Initiative 
गोवा

Sattari Swachhata Initiative: सत्तरी स्वच्छता उपक्रम! पंचायत, पालिकांना 2 लाख रुपये जिंकण्याची संधी

वन आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व त्यांच्या पत्नी आमदार देविया राणे यांनी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Sattari Swachhata Initiative: सत्तरी तालुक्यासाठी एका अनोख्या स्वच्छता स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. पंचायत आणि पालिकेसाठी असलेल्या या स्पर्धेत दोन लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

वन आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व त्यांच्या पत्नी आमदार देविया राणे यांनी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

गोव्यातील ही पहिलीच अनोखी स्पर्धा असून, एक ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. डिसेंबरच्या अखेरीस या स्पर्धेत सहभागी पालिका आणि पंचायत यांचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

सत्तरी स्वच्छता उपक्रमांतर्गत तरुण आणि वयस्कर अशा सर्व स्तरातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टर, निबंध आणि स्वच्छतेसंबधित इतर स्पर्धा देखील आयोजित केल्या जाणार आहेत, असे राणे यांनी म्हटले आहे.

स्पर्धेच्या यशाचे विश्लेषण करण्यासाठी पंच सदस्य, सरपंच, एसएचजी आणि इतर लोकांचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल. तसेच, समिती लोकांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन याबाबत जनजागृती करतील.

स्वच्छता उपक्रमाच्या अंतर्गत सत्तरीत स्वच्छता राखण्यासाठी आणि हे मॉडेल पुढे राज्यात विस्तारीत करण्याची आमचे ध्येय आहे, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

SCROLL FOR NEXT