Goa Shimagotsav 2022 Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत शिगमोत्सवाला उत्साहात सुरुवात

सत्तरीत नगरगावात आंबेडे, धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, ब्रम्हाकरमळी, हेदोडे आदी गावात शिमगोत्सव शेकडो वर्षापासून साजरा केला जातो

दैनिक गोमन्तक

वाळपई: सत्तरी तालुक्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल रात्री होळी घालून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सत्तरीत नगरगावात आंबेडे, धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, ब्रम्हाकरमळी, हेदोडे आदी गावात शिमगोत्सव शेकडो वर्षापासून साजरा केला जातो आहे. नगरगाव भागात शिगमोत्सव यामध्ये करवल्या हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आलेला आहे. गुरुवारी रात्री होळी गावच्या मंदिराबाहेर अनेक गावात घालण्यात आली. यावेळी तरुणांचा मोठा उत्साह होता.

शुक्रवारी चोर हा खेळ खेळण्यात आला. त्यात लहान मुलांना विशेष रुपात पाठीवर पानांचे साधन बांधून, तोंडाला काळा रंग फासवून हे चोर प्रत्येकाच्या घरी गेले. सत्तरीत विविध ठिकाणी येथे घरोघरी चोर गेले. त्यावेळी लोकांनी चोरांची मोठ्या भक्तीभावाने विधीवत पूजा केली. सत्तरीत शिमगोत्सवाचे वातावरण तयार झाले असून पुढील सात दिवस वेगवेगळ्या पारंपारिक उत्सवाच्या माध्यमातून शिगमोत्सवात आनंदाचे वातावरण पहावयास मिळणार आहे.

काही गावातील नागरिक देवाची राय या नैसर्गिक संपत्ती मधून विशिष्ट प्रकारच्या झाडांची होळी आणून पुजलेली आहे. तर काही गावातील लोक जंगलामधील आंब्याची नामक झाडाची निवड करुन होळी साजरी केली आहे. होळी झाल्यानंतर रोमाट साजरे करणे हासुद्धा शिगमोत्सवातील एक विशिष्ट असा प्रकार आहे.

पुढील सात दिवस रोमटामेळ खेळ खेलले जाणार आहेत.. प्रत्येक गावांमध्ये पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. बालगोपाळ यापासून ते आबालवृद्ध पर्यंत या रोमटामेळ प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर व बेभान होऊन नाचणे हा यारोमाट या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग. ढोलावर काठी पडली व ताशांचा आवाज कानांमध्ये घुमू लागला की प्रत्येकाची पावले या पारंपारिक नृत्यावर थिरकत असतात अशा प्रकारची परिस्थिती प्रत्येक गावांमध्ये पहावयास मिळत आहे. झर्मेचा, करंझोळचा चोरोत्सव विशेष ओळख सत्तरीत बनली आहे. मासोर्डेची घोडेमोडणीही प्रसिध्द आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT