Fish Market
Fish Market Dainik Gomantak

तारली, बांगडा दरात घट; पापलेट, इसवण महाग

पापलेट 1200 ते 1400, बांगडे 200 रुपये प्रती किलो
Published on

पणजी: आज पणजी मासळी बाजारात होळी निमित्त सुट्टी असल्याने मासळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. विविध प्रकारच्या मासे आज बाजारात उपलब्ध होते.

पापलेट आणि इसवण माशाचे दर गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर आहेत. पापलेटचा दर प्रती किलो 1200 ते 1400 आहे, इसवण 700-850 प्रती किलो आहे. मात्र, तारली आणि बांगड्याचे दरात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात तारली दर 150 रू प्रती किलो होती तर बांगडा 200 रूपये प्रती किलो दराने विकले जात होते.

  Fish Market
गोव्यात काळजीवाहू मुख्यमंत्री किती दिवसांचा?

आज तारली 100 रू प्रती किलो तर बांगडा 150 ते 200 रूपये प्रती किलो दराने उपलब्ध होते. तारली, बांगडे, कर्ली, खेकडे, इसवण, कोळंबी, टोकी, माणकी, तिसऱ्या आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध होती.

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक म्हणजे मासळी होय. गोव्यात ताजी मासळी मिळते तसेच गोमंतकीय पद्धतीचे जेवण अनेक देशी तसे विदेशी पर्यटकांना आवडते. गोमंतकीय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक खास गोव्यात येत असतात.

मासळी दर प्रती किलो (रुपये)

1. तारली ------------------100

2. बांगडे -------------150-200

3. टोकी --------------100-150

4. लेपो --------------------300

5. कर्ली -------------------350

6. माणकी -----------------400

7. कोळंबी -----------------500

8. पापलेट ----------1200-1400

9. इसवण -------------700-850

  Fish Market
आंबेली सत्तरीत पकडला 12 फुटी किंग कोब्रा

मासळी दर प्रती वाटा

1. तारली ------------------100

2. बांगडा ------------------100

3. टोकी -------------------100

4. तिसऱ्या -----------------100

5. कोळंबी ------200, 300, 600 (आकारानुसार)

6. इसवण -----------------700

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com