Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : बेकायदा चिरेखाणीवर छापा; खाण खात्याची सोनाळीत कारवाई

Panaji News : यावेळी घटनास्थळावरून चिरेखाणी काढण्याचे एक मशिन, दोन पावर टिलर, दोन लहान डिझेल जनरेटर, एक मेटल ब्लेड व एक ट्रक एका ठिकाणावरून तर दुसऱ्या ठिकाणावरून एक चिरे दगड कापणारी मशिन, एक पावर टिलर, एक जनरेटर व दोन डिझेल कॅन जप्त करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, धावे-सोनाळ (सत्तरी) येथील बेकायदा चिरखाणेवर खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईवेळी सुमारे १० लाखांची मशिनरी जप्त करण्यात आली.

खात्याच्या तक्रारीनंतर वाळपई पोलिसांनी सावर्डे पंचायतीचे माजी सरपंच नीलेश राणे व नगरगावचे उपसरपंच रामा खरवत या दोघांविरुद्ध भादंसंच्या कलम ३७९ व गोवा दमण व दीव खाण व खनिज कन्सेशन नियमाच्या कलम ३ खाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी दिली.

बेकायदा चिरेखाणी सुरू असल्याची माहिती खाण खात्याला मिळाल्यावर आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास धावे सोनाळ येथे खात्याचे सहाय्यक भूगर्भ तज्ज्ञ जितेंद्र वेळुस्कर यांनी वाळपई पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी तेथे चार ते पाच कामगार मशिनरीने चिरे काढण्याचे काम करत असताना आढळून आले.

यावेळी घटनास्थळावरून चिरेखाणी काढण्याचे एक मशिन, दोन पावर टिलर, दोन लहान डिझेल जनरेटर, एक मेटल ब्लेड व एक ट्रक एका ठिकाणावरून तर दुसऱ्या ठिकाणावरून एक चिरे दगड कापणारी मशिन, एक पावर टिलर, एक जनरेटर व दोन डिझेल कॅन जप्त करण्यात आले.

ही जमीन संशयित नीलेश राणे यांच्या मालकीची असून संशयित रामा खरवत हा चिरे उत्खनन करत होता. चिऱ्यांचे उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना घेतलेला नव्हता. जप्त करण्यात आलेल्या चिऱ्यांचे मूल्यांकन करून त्याची विल्हेवाट लावली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT