Sattari Ram Navami  Dainik Gomantak
गोवा

Sattari Ram Navami : सत्तरी तालुक्यात विविध मंदिरांत रामनवमी उत्साहात

Sattari Ram Navami : हनुमान मंदिरात विविध कार्यक्रम : खडकी, उस्ते, ठाणे-सत्तरी भागातही सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Ram Navami :

वाळपई, आज बुधवारी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सत्तरीच्या विविध भागात रामनवमी उत्साहात साजरा करण्यात आला. राम नामाच्या जयघोषामुळे गावात आनंदी व भक्तीमय वातावरण पसरले होते.

वाळपई श्री हनुमान देवस्थानात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. रामनवमी निमित्त मंदिर परिसर रोषणाईने सजला होता.

तसेच श्री हनुमानाची मूर्ती फुलांनी सजवली होती. वाळपई श्री हनुमान देवस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दुपारी १२ वा. राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर स्थानिकांचे भजन, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद त्यांतर रात्री नाट्य प्रयोग झाला. खडकी सत्तरी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरी. सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. संध्याकाळी वाजता भजन, रात्री ९.३० वा. नाट्य प्रयोग झाला.

उस्ते सत्तरी येथील श्रीराम वाळपई : श्री हनुमान मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात रामनवमीनिमित्त अखंड रामनाम जप, सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. श्री राम जन्मोत्सव, तदनंतर आरती, तिर्थ प्रसाद, महाप्रसाद, रात्री ९ वा. पंढरपूर वारीचे फॉर्म वितरण, रात्री ९.३० वा. 'करया सेटिंग' हे नाटक झाले. ठाणे राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव थाटात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT