Sattari people's Dainik Gomantak
गोवा

Goa Water Problem: विकासगंगा सत्तरीत; पण जनता पाण्यासाठी आसुलेलीच!

बहुतांश गावांची टॅंकरवरच भिस्त

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Water Problem: गोवा मुक्ती होऊन साठ वर्षे उलटली तरीही सत्तरी तालुक्यात पाणी समस्या जैसे थे आहे. आजही टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सत्तरीतून म्हादई नदी वाहते, शिवाय पायाभूत सुविधांची विकासगंगाही वाहते.

पण पाण्याचे योग्य नियोजन गेल्या साठ वर्षात न झाल्याने समस्या जटील झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, अशा मागणीचे सत्तरी जलसंपदा लोकाधिकार मंचने निवेदन आज दुपारी वाळपई मामलेदार व उपजिल्हाधिकारी यांना सादर केले.

जलसंवर्धनासाठी सत्तरी जलसंपदा लोकाधिकार मंच, अशी नवी स्थापना करण्यात आलेली असून मंचच्या सदस्यांनी निवेदन दिले आहे.

मंचचे रामनाथ वरक म्हणाले, हा नवा मंच गावोगावी जलसंवर्धनासाठी जनजागृती करणार आहे. त्यासाठी सर्व पंचायतींना निवेदने सादर करणार आहे. सत्तरीतील जलस्त्रोतांचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे.

"आजही १८ एमएलडी म्हणजेच दररोज १.८ कोटी लिटर पाण्याची कमतरता भासते. गेल्या पन्नास वर्षात लोकप्रतिनिधींनी तोडगा काढला नाही. शेळप गावात टँकरनेच पाणी पुरविले जाते. बहुतांश गावात पाणी टंचाई आहे. सत्तरीत म्हादई वाहत असूनही समस्या का ?"

-भैरू वरक, जलसंपदा मंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT