Hivre Budruk Cyclone Damaged Houses Repair Dainik Gomantak
गोवा

चक्रीवादळानंतर आमदारांकडून मदत, हिवरे बुद्रुकमधील नुकसानग्रस्त घरांची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

Hivre Budruk Cyclone Damaged Houses Repair: सत्तरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्यात हिवरे बुद्रुक येथील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्यात हिवरे बुद्रुक येथील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत नुकसानग्रस्तांच्या घरांची स्वखर्चाने दुरुस्ती करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

७ मे रोजी झालेल्या वादळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे गावातील अनेक घरांवर झाडे कोसळली होती. देवकी देवू गावकर आणि कृष्णा गणेश गावकर यांच्या घरांवर मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने छप्पर पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले.

तसेच अंजली अनिल गावकर यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली, तर गोपिका गोपाळ गावकर यांच्या घरावरील कौले वाऱ्याने उडाली होती. जानकी तानवडे यांच्यासह इतर अनेक कुटुंबांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, या घटनेची माहिती समोर येताच आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना गावात पाठवून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर कोणताही विलंब न लावता नुकसानग्रस्त घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.

घरांची कौले, पत्रे, छप्पर तसेच इतर बांधकामांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच अनेक कुटुंबांना सुरक्षित निवारा उपलब्ध झाला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सत्तरीतील जनता हेच आमचे कुटुंब!

आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, सत्तरीतील जनता हे आमचे कुटुंब आहे. त्यांच्या समस्या दूर करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची दुरुस्ती होणे गरजेचे होते. सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान वाटत आहे.

गरिबांसाठी आधारवड!

स्थानिक पंचसदस्य अनुष्का गावस यांनी सांगितले की, आमच्या गावात चक्रीवादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाले होते. अशावेळी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी धावून येत स्वखर्चाने घरांची दुरुस्ती करून दिली. यापूर्वीही त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना नवी घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांसाठी त्या मोठा आधार ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT