Goa Mango Market Prices Dainik Gomantak
गोवा

Goa Mango Price: आंब्यांची आवक वाढली, दर मात्र चढेच; सामान्य ग्राहकांच्या खिशाला अजूनही चाट

Goa Mango Rates: उत्पादन घटले असले तरी वाळपई बाजारात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक दिसून येत आहे. मात्र यामुळे दर काहीसे चढलेले असून सामान्य ग्राहकांसाठी हे दर परवडणारे राहिलेले नाहीत.

Sameer Panditrao

वाळपई: मे महिन्यात आंब्याचा हंगाम जरी सुरू झाला असला तरी यंदा सत्तरी तालुक्यात आंब्याचे उत्पादन सुमारे ४० टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन घटले असले तरी वाळपई बाजारात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक दिसून येत आहे. मात्र यामुळे दर काहीसे चढलेले असून सामान्य ग्राहकांसाठी हे दर परवडणारे राहिलेले नाहीत.

दरवर्षी गोडीने खाल्ले जाणारे गावठी आंबे यंदा १,५०० रुपये प्रतिडझनपर्यंत विकले जात असून, बाजारात आंब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. वाळपईतील विक्रेते सांगतात की, यंदा आंब्याची मुख्य आवक शिवोली आणि अन्य भागांतून होत आहे.

राधिका गावडे, वाळपई बाजारात पारंपरिक पद्धतीने आंबे विकणाऱ्या स्थानिक महिला विक्रेत्या म्हणाल्या, “आम्ही गवत घालून नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवतो, त्यामुळे आमचे नियमित ग्राहक परत परत येतात. पण बाहेरून आलेले व्यापारी रसायन वापरून फळे पिकवतात, ज्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होतो.”

Goa Mango Price

रस्त्याच्या कडेला अनधिकृत फळ विक्रीत वाढ होत असून या विक्रेत्यांमुळे स्थानिक विक्रेत्यांना व्यवसायात अडचणी येत आहेत. स्थानिक विक्रेते आणि शेतकरी यांचं म्हणणं आहे की, अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण ठेवावे. सध्या दर जरी वाढलेले असले तरी अजूनही आंब्याचा हंगाम सुरूच आहे. त्यामुळे खवय्ये दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

रसायनयुक्त आंब्यांमुळे आरोग्याची चिंता

बाजारात रसायनाच्या साहाय्याने पिकवलेले आंबे विकले जात असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या आंब्यांवर रसायनांचा वापर होतो का, याची तपासणी नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

रानटी जनावरांचा उपद्रव

यंदा सत्तरीत आंब्याचे पीक कमी आहे आणि त्यात रानटी जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. खासकरून शेकरु, खेती, माकडे, वानर यांचा संचार वाढला आहे. खेत्यांचा वावर वाढला असून कळपाने येऊन पिकाचा नाश करतात. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तोंडाला आलेले पीक ते नाहीसे करतात. यंदा काजू पीकसुध्दा खूप कमी होते आणि उरले सुरलेले आंबेसुध्दा असेच नष्ट होत राहिले, तर शेतकरी करणार तरी काय असा सवाल शेतकरी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT