Sattari illegal tobacco sale Dainik Gomantak
गोवा

Sattari: सत्तरीत प्रशासनाची मोठी कारवाई! तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर धाड; धोकादायक पदार्थ जप्त

Sattari Illegal Tobacco: सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा, ठाणे, केरी या भागांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानांवर सत्तरी मामलेदार यंत्रणेतर्फे धडक कारवाई करण्यात आली.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्यातील वाळपई, होंडा, ठाणे, केरी या भागांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानांवर सत्तरी मामलेदार यंत्रणेतर्फे धडक कारवाई करण्यात आली. अचानकपणे घातलेल्या या छाप्यांत अनेक ठिकाणांहून तंबाखूजन्य वस्तू जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सत्तरी तालुक्याचे मामलेदार धीरेंद्र बाणवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत संयुक्त मामलेदार विष्णू राणे, वाळपई सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राचे सॅनेटरी इन्स्पेक्टर गजानन पार्सेकर यांच्यासह इतर अधिकारी सहभागी झाले होते.

मामलेदार बाणवलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सरकारने संपूर्ण बंदी घातलेली असूनही काही दुकानांमधून ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने कारवाई आवश्यक ठरली.

कारवाई दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. ज्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यांना पुन्हा असे प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मामलेदार बाणावलीकर म्हणाले, “सरकारची बंदी असूनही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याचा भंग असून नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Prize Money: आशिया कप विजेता संघ होणार मालामाल; किती कोटी रुपये मिळणार? जाणून घ्या

Rama Kankonkar: लोक घराबाहेर पडून 'गोवा बंद' करू लागले तरी आश्चर्य वाटायला नको! रामा काणकोणकर हल्ला प्रकरण

Goa Rain Update: गोमंतकीयांनो सावधान! पुढील काही दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

New Water Pipelines: '..नव्या जलवाहिन्यांसाठी 2 हजार कोटी लागतील'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Rabies Free Goa: रेबीज नियंत्रणात गोवा अव्वल! 2019 पासून एकही रुग्ण नाही; ठरले भारतातील एकमेव राज्य

SCROLL FOR NEXT