FDA Raid: अस्वच्छ जागी बनायचे दही, जायचे नामांकित हॉटेल-दुकानात; ‘एफडीए’च्या कारवाईत म्हापसा येथील युनिट बंद

FDA Raid Mapusa: गावसावाडा, म्हापसा येथे अस्वच्छ भाड्याच्या खोलीत चालणाऱ्या देशी दही बनवणाऱ्या युनिटवर एफडीएने शुक्रवारी छापा टाकला. हे युनिट आवश्यक परवान्याशिवाय मागील दोन ते तीन वर्षांपासून कार्यरत होते.
Goa FDA Raid
FDA RaidX
Published on
Updated on

म्हापसा: गावसावाडा, म्हापसा येथे अस्वच्छ भाड्याच्या खोलीत चालणाऱ्या देशी दही बनवणाऱ्या युनिटवर एफडीएने शुक्रवारी (ता.१२) छापा टाकला. हे युनिट आवश्यक परवान्याशिवाय मागील दोन ते तीन वर्षांपासून कार्यरत होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वरील देशी दही बनवणारे युनिट दही तयार करून ते प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक करत होते. नंतर ही दही तिसवाडी, बार्देश, पेडणे तालुक्यासह नामांकित हॉटेल्स, दुकाने व रेस्टॉरंटमध्ये वितरणासाठी पाठवून द्यायचे. एफडीएने छाप्यादरम्यान या युनिटला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, सदर परिसर तत्काळ रिकामा करण्याचे आदेश दिलेत.

Goa FDA Raid
FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

यावेळी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे युनिट कोणत्याही परवानगीशिवाय कार्यरत होते. याठिकाणी दही तयार केले जायचे. त्याशिवाय पनीर, दही व इतर दुग्धजन्य पदार्थ तिसवाडी, बार्देश, पेडणे यांच्यासह हॉटेल्स, रेस्टॉरंटला सकाळच्या वेळी वाहनातून वितरण करायचे.

Goa FDA Raid
कळंगुट आणि कांदोळी येथे भेसळयुक्त काजू विकणाऱ्या 4 दुकानांवर FDA ची कारवाई

मागील काही दिवसांपासून या युनिटवर आम्ही पाळत ठेवून होतो. त्यानुसार आम्हाला गावसावाडा येथील या युनिटचा सुगावा लागला. इतरही दुग्धजन्य पदार्थ याठिकाणी सापडले, मात्र ते ब्रँडचे होते. परंतु, इथे दही तयार केले जायचे. जे प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवले जायचे. परिणामी, या युनिटधारकाला आम्ही २० हजारांचा दंड ठोठावला. ही जागा अस्वच्छ व कोणत्याही परवानगीशिवाय कार्यरत असल्याने हे युनिट ताबडतोब बंद करण्याचे निर्देश संबंधिताला दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com