Sattari Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sattari Sand Mining: 'म्हादई'ला वाली कोण? अवैध वाळू तस्करीने नदी पात्राला धोका वाढला

नदी काठची जमीन कोसळत असल्याने शेतकरी धास्तावले

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने वाळू उत्खनन सुरू करण्याच्या प्रस्तावास पुन्हा मान्यता दिली असली आहे. तरी देखील राज्यातील वाळू तस्करीचे प्रकार पुर्ण बंद झाले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापार्श्वभूमीवर सत्तरी येथील म्हादई नदी पात्रात बेकायदेशीर वाळू तस्करीने पात्राला धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी नदी काठची जमीन कोसळत असल्याच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांना म्हादईला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.

( Sattari illegal sand mining poses threat to Mhadei river )

मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी येथील म्हादई नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा केल्याने आता नदी पात्राला गंभीर धोका निर्माण झाला आहे.पात्रात अनेक ठिकाणच्या दोन्ही काठावर सर्रासपणे अवैध वाळू उपसा सुरु असल्याने नदीचे पात्र खोल गेल्याने नदीची धूप होत आहे. सरकारी अधिकारीही या बेकायदेशीर कामात गुंतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

गोवा खाण व भूगर्भ संचालनालयाने राज्यातील अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके स्थापन केली आहेत. मात्र असे असूनही, मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. ज्यामुळे नदी पात्राला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा आरोप एका नागरीकाने केला.

नदी पात्राचा झालेला अमर्याद वाळू उपसा यामुळे आता दोन्ही काठची जमीन कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या समस्येर मार्ग कोण काढणार की नाही? असा सवाल आता स्थानिक विचारु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT