Sattari Tree, Poles Collapse  Dainik Gomantak
गोवा

Sattari News: सत्तरीत वादळी पाऊस, अग्निशमन जवानांची धावपळ; लाखोंची हानी

Trees And Light Poles Collapsed At Sattari: मध्यरात्रीपासून सुमारे ४६ ठिकाणी झाडांची पडझड झाली

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: मुसळधार पाऊस आणि सोमवारी मध्यरात्रीपासून सत्तरीत वादळी पासवाच्या तडाख्यात मंगळवारी(आज) अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन लाखोंचे नुकसान झाले. तसेच वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला शिवाय वीज वाहिन्यांचे २० लाखांचे नुकसान झाले.एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

भुईपाल येथे घरावर झाड पडून तिघे किरकोळ जखमी झाले तर धावे सत्तरी येथे देवगो सावर्डेकर यांच्या घराची भिंत कोसळली. मध्यरात्रीपासून सुमारे ४६ ठिकाणी झाडांची पडझड झाली. शेती बागायतीचेही नुकसान झाले आहे. बागायतीमधील केळी, पोफळी उन्मळून पडली आहेत.

सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास केरी येथे आंब्याचे व रानटी झाड रस्त्यावर पडले. म्हाऊस येथे मुख्य रस्त्यावर झाड पडून वीज वाहिनी व गॅरेजच्या छपराचे नुकसान झाले. वाळपई मामलेदार कार्यालयाच्या छपरावर फांदी पडून सुमारे ३ हजारांचे नुकसान झाले.

अग्निशमन जवानांची धावपळ

मध्यरात्रीपासून सुमारे ४६ वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडली. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ झाली.यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य केले. तसेच वीज कर्मचाऱ्यांचेही कौतुक होत आहे.

घराचे छप्पर उडाले

होंडा पंचायतीजवळ सरफराज शेख यांच्या घराचे वादळी वाऱ्यात छप्पर उडाले, त्यामुळे लाखाचे नुकसान झाले. यावेळी स्थानिक होंडा सरपंच व इतरांनी दुर्घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले.

वेळुसने ओलांडली धोका पातळी

वेळुस नदीची पातळी दिवसेंदिवस वाढत असून नदीकाठच्या रामा गावकर यांच्या बागायतीत पाणी शिरल्याने बागायतीचे मोठे नुकसान झाले. कालपासून वादळी पावसामुळे वेळुस नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT