Sattari  Dainik Gomantak
गोवा

Sattari News : सत्तरीत रस्त्यालगत उगवली पावसाळी नैसर्गिक भाजी

Sattari News : औषधी गुणधर्म : तायकुळा, कुर्डू, कर्टोली, कपाळ फोडी भाजीला लोकांची पसंती

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News :

वाळपई, मे महिन्यात कोसळलेला अवकाळी पाऊस व आता मॉन्सून पावसाच्या जोरावर सत्तरी तालुक्यात रस्त्यालगत नैसर्गिक पावसाळी भाज्या उगवण्यास सुरवात झाली आहे. तायकुळा, तेरे, अळू अशा भाज्यांचा आस्वाद पावसाळ्यात लोक अधिक करून घेतात.

पूर्वीच्या काळी मानव आपल्या परिसरात, रानात उगवलेल्या नैसर्गिक भाज्यांना महत्त्व देत अशा औषधी गुणधर्मांनी तयार झालेल्या भाज्यांचे सेवन करीत होता. सध्या पावसाळा असल्याने नैसर्गिक घटकांना बहर येऊ लागला आहे.

सत्तरीत तायकुळा वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवलेली आहे. मेथीच्या भाजीप्रमाणे दिसणारी कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. तायकुळाच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तायकुळाच्या पानांची भाजी सर्वप्रकारच्या त्वचारोगात औषधी म्हणून वापरतात. दुसरी म्हणजे कुर्डूची भाजी. याची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात.

दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात ही भाजी उपयुक्त आहे. कर्टोली एक फळभाजी असून कारल्यासारखी दिसते आणि कडूसुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. कर्टोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

कपाळ फोडी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीची वेल जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो.

विविध प्रकारच्या भाज्या

कुड्याच्या शेंगादेखील चटणी करण्यासाठी वापरल्या जात आहेत. कातने, हजार मूट, घोटशेरो, गुळवेल, गोयाटा, तेरे, बोणकाळो, पांढरा कुडा, कपाल फोडी, कुरडू, साळकाणो, सुरण, आघाडा, हरफूल, केना, पोपटा, भारंगी, रानमेथी, गुळवेल, घोटवेल, टेटू, दिणो, रानकर्मल अशा बरेचशा नैसर्गिक भाज्यांचा वापर लोक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Goa News: झुआरीनगर येथे कारच्या धडकेत महिला जखमी; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT